पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरू. अध्याय १२ वा. [ स्तबक, प्रभावतीस पुत्रप्राप्ती. प्रभावती पतीच्या सहवासांत आनंदानें दिवस घालवीत असतां, एके दिवशी तिच्याकडे तिच्या चुलत वहिणी, म्हणजे मुनाभाच्या मुली, चंद्रावती व गुण- वती, अशा दोघी आल्या. पतिसहवासांत कांहीं दिवस गेल्यामुळे प्रभावतीच्या प्रकृतीत व आकृतींत बराच फरक झाला होता. त्या फरकावरून तिच्या दोघी बहिणींनी, ती पुरुषाच्या सहवासांत असावी असें जाणलें. तेव्हां त्यांच्यापैकी एक- जण प्रभावतीला म्हणाली; " गडे प्रभावती, तुला दुर्वासऋषींनी दिलेल्या वरप्रदानाप्रमाणे फळ मिळाले, असे दिसतें. तुझे ओंठ विडा खाऊन रंगले आहेत, तुझ्या गुलाबी गालांवर पुरुषाच्या दंतत्रणाची खूण दिसत आहे, ऊर- स्थल उन्नत झालेले आहे; आणि चेहरा आनंदभरित दिसत आहे. यावरून तुला योग्य पति मिळाला, असे दिसतें. तूं अशा कोणा भाग्यवानाला आपल्या महालांत आणले आहेस, ते आम्हांला सांगतेस का ??" तेव्हां प्रभावतीनें त्या दोघींना झालेला सर्व प्रकार सांगून, मंचकावर मदन निजला होता, तो त्यांना दाखविला. त्या सुंदर मदनास पाहून, त्या दोघीजणी म्हणाल्या, 'प्रभावती, तुझें भाग्य थोर, म्हणून तुला असा पति मिळाला. प्रभावती, आमचा विचारहि यदु वंशांतीलच पुरुपाबरोबर विवाह करण्याचा आहे; तर तूं आपल्या पतीला सांगून आमच्या विवाहाचीहि कांहीं तजवीज कर." तेव्हां प्रभावती म्हणाली, " यांच्याबरोबर आणखी दोन पुरुष आलेले आहेत. ते रूपगुणांनी यांच्याचप्रमाणे आहेत, तेव्हां त्यांच्यासंबंधाने मी विचारून पाहतें." असें म्हणून प्रभावती मदनाकडे गेली, व तिनें त्यास आपल्या दोन्हीं बहिणींची इच्छा दर्शविली. तें ऐकून मदन म्हणाला, ८८ या गोष्टीला ते दोघेहि मोठ्या आनंदाने तयार होतील, ते दोघेहि मोठे पराक्रमी आहेत. त्या दोघांची नांवें गद व सांच अशी आहेत. गद हा माझा चुलता असून, सांब हा माझा सावत्र बंधु आहे. रुक्मिणी स्वयंवराचे वेळीं, गदानें जरासंधाशीं युद्ध करून जय मिळविला आहे. तसेंच सांत्र हाहि मोठा पराक्रमी असून त्यानें दुर्योधनाची मलगी लक्ष्मणा, ही स्वयंवरांत मिळवून आणलेली आहे." लक्ष्मणेच नांव निघाल्यावर प्रभावती हाणाली, “ मला लक्ष्मणेच्या स्वयंवराची कथा ऐकण्याची फार इच्छा आहे, तर तेवढी कृपा करून सांगावी." मग मदन तिला लक्ष्म- णेच्या स्वयंवराची कथा सांगू लागला. हरतनापुरचा राजा दुर्योधन, याची लक्ष्मणा ही मुलगी होय; ती उपवर झाल्यावर त्या राजानें देशोदेशींचे भूपाळ बोलावून, लक्ष्मणेच स्वयंवर मांडले. त्यावेळी सांवानें लग्नमंडपांतून लक्ष्मणेचे (6 , ((