पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Y १ लें. ] अध्याय ११ वा. आणि तसे होण्यासारखे नसेल तर तसें स्पष्ट सांग, म्हणजे मी आपली आत्म- इत्या करून या तापत्रयांतून एकदांची सुटेन तरी. " हंसिणी ह्मणाली; " बाई प्रभावती, धैर्य धर, आज रात्री त्याची व तुझी खात्रीनें भेट होईल." असे प्रभावतीला सांगून हंसिणी मदनाकडे आली, व प्रभावतीचा निश्चय तिनें त्यास 6 कळवून, ' तूं आज तिच्याकडे गेला नाहींस तर ती प्राणत्याग करील' ह्मणून बजाविलें. इंसिणीचा हा निरोप ऐकून प्रभावतीचे महालांत कसा प्रवेश करितां येईल याचा मदनास मोठा विचार पडला. सायंकाळची वेळ झाल्यावर तो प्रभावतीच्या महाला जवळ गेला व कोणत्या युक्तीनें आंत जातां येईल, तें शोधूं लागला. पण बराच वेळ झाला तरी त्याला योग्य अशी संधी मिळेना. इतक्यांत एक माळीण दुरडींत फुले घेऊन प्रभावतीच्या महालांत जाऊ लागली. तेव्हां मदनानें भ्रमराचें रूप धारण केले व तो त्या दुरडींतील एका कमळांत जाऊन बसला. प्रभावतीच्या महालांत माळीण आल्यावर तिनें तिच्या जवळून फुलें घेतलीं, व तिला निरोप दिला. आज आपणाकडे मदन खात्रीने येणार, या आशेनें तिला मोठा आनंद झाला होता. रोजच्या पेक्षांहि आज आपण विशेष सुस्वरूप दिसावें म्हणून ती वस्त्रे व भूषणें टाकटिकीनें लेवूं लागली. आपली वेणी तिनें बकुळाच्या फुलानें गुंफून डोकींवर एक सुंदर कम- ळाचें फूल खोविलें. त्याच कमळांत मदन भृंग्याच्या रूपानें राहिला होता. कपाळावर मालतीच्या कळ्यांची झालर करून तिनें लाविली. डोळ्यांत काजळ घातलें. कुसुंबी रंगाचें पातळ पायघोळ नेसली, अंगांत सुंदर चोळी घालून त्यावर फुलांची जाळी बसविली. या प्रमाणे थाट करून, ती मदनाची वाट पहात बसली. परंतु बराच वेळ झालातरी तिला मदन येतांना दिसेना. तेव्हां ती फारच कष्टी झाली व निराशेनें तिच्या डोळ्यास पाणी आले. इतक्यांत तेथे हंसिणी आली. तिला पाहतांच प्रभावतीस अधिक रडूं कोसळले. ती म्हणाली, हंसिणी, तूं गोड गोड बोलून, मला फसवितेस मात्र, इतका वेळ झाला तरी मदनाचा कांहीं पत्ता नाहीं, तेव्हां आज तो येत नाही हेंच खास आणि उद्यां तरी झेणार अशी खात्री कोठे आहे; तेव्हां मला आतां प्राणत्याग करण्यावांचून दुसरा उपायच नाहीं !" असे म्हणून प्रभावती शोकभारानें व्याकूळ होऊन पलंगावर निचेष्ट पडली. प्रभावतीची आपणाठायी असलेली ती निष्कपट भक्ति पाहून मदनानें आपले पूर्वरूप प्रगट केलें. मदनास पाहतांच हंसिणीनें प्रभावतीस सावध केलें. मदनाची ती मनोहर मूर्ति पाहतांच, प्रभावतीस आपल्या जन्माचें सार्थक मग प्रभावतीनें मदनास, मंगलस्नान घालून, सुंदर वस्त्रे व अलंकार घालावयाला दिले. नंतर मदनानें गांधर्व - लग्नाचे मंत्र म्हटले व प्रभाव- तीनें मदनाच्या गळ्यांत माळ घातली. याप्रमाणें मदन आणि प्रभावती यांचा गांधर्वविवाह होऊन तो दोघेंहि सुखाचा अनुभव घेऊं लागली.. 66 झाले असे वाटलें.