पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरू. [ स्तबक ६८ कृष्णाचे हात व तोंड लोण्याने भरलेले आहेत. तेव्हां तीं कृष्णास धरून बांधूं लागली; पण तितक्यांत तो तिच्या हातांतून निसटला, व पळू लागला. यशोदा त्याला धरण्यासाठी त्याच्या मागे पळत होती; पण तो कांहीं सांपडेना.. शेवटीं कृष्णासच वाटलें कीं, आपल्या मागें पळून पळून यशोदा फार थकली आहे, तेव्हां जास्त पळविणे बरें नाहीं झणून तो उभा राहिला. मग यशोदेनें गुराला बांधावयाची दोरी आणून त्याला ती बांधूं लागली; पण त्याच्या कमरेला एक दावें पुरेना म्हणून तिनें आणखी एक आणलें; पण तेंहि पुरेना, तेव्हां तिनें पुन्हां तिसरे आणले. याप्रमाणे पांच सहा दावीं आणल्यावर कृष्णाला वाटलें कीं, आतां अधिक त्रास देणे बरें नव्हे, म्हणून त्यानें यशोदेस बांधू दिलें. यशोदेनें दोरीचा एक पदर कृष्णाच्या कमरेला बांधून दुसरा पदर आंगणांत उखळी होती, त्या उखळीला बांधला. याप्रमाणें बंदोबस्त केल्यावर यशोदा घरांत जाऊन, गृहकृत्यें करूं लागली. इकडे कृष्णानें तें उसळ ओढित ओढित बाहेर आणलें व रस्त्यानें ओढून लांब नेऊं लागला; परंतु जवळ जवळ अस लेल्या त्या दोन वृक्षांच्यामध्ये ते उखळ अडल्यामुळे बाहेर निघेना, तेव्हां कृष्णानें आपल्या दोन्हीं हातांनी ते दोन्हीं वृक्ष उलथून पाडले. इतक्यांत ते वृक्ष नाहींसे होऊन त्याऐवजी दोन सर्वांग सुंदर पुरुष उत्पन्न झाले. तेच मणीग्रीव व नळकुबेर होत. शापमुक्त झाल्यामुळे त्यांस फार आनंद झाला, व ते दोघे श्रीकृष्णास वंदन करून स्वस्थानी निघून गेले. ४ प्रभावतीच्या महालांत मदनाचा प्रवेश. ही कथा सांगून वैशंपायन जनमेजयाला म्हणाले; “राजा जनमेजया, आतां प्रभावतीचें पुढे काय झालें तें तुला सांगतो. प्रभावती आपल्या महालांत, त्या मदनाप्रमाणे दिसणाऱ्या नटाविषयी विचार करीत असतांना, तेथें हंसिणी. आली. हंसिणीला पाहिल्याबरोबर प्रभावती म्हणाली, " बाई हंसिणी, आतां त्या मदनाचा मला फारच ध्यास लागला आहे, तो प्राप्त होण्याची कांहीं आशा असेल तर सांग, नाहीतर मी आपला प्राणत्याग करीन. हंसिणी, हल्लीं या शह- रांत जे कांहीं नट खेळ करण्यासाठी आले आहेत, त्यांत एकतर अगदीं मदना- सारखा आहे. तो नट नसता तर त्याला मदनच म्हणून समजलें असतें. त्या नटाला पाहिल्यापासून मला वारंवार मदनाची आठवण होऊन मी त्याच्यासाठी अगदीं व्याकूळ होत आहे." हे प्रभावतीचें बोलणे ऐकून हंसिणी हंसूं लागली. ती प्रभावतीला म्हणाली, "प्रभावती, तोच मदन आहे, त्यानें नटवेश घेऊन, या नगरांत तर प्रवेश केला आहे. आतां कांहीं युक्तीनें तो तुझ्या महालांतहि प्रवेश करील." हंसिणीचें हैं बोलणे ऐकुन प्रभावतीला फार हर्ष झाला; व मदनाला भेटण्याची तिची उत्कंठाहि त्याबरोबर दुप्पट वाढली. ती हंसिणीला ह्मणाली; हंसिणी, तूं वाटेल तो प्रयत्न करून, मदनाची व माझी भेट होईल असें कर 66