पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लं. ] अध्याय ११ वा. ६७ झाला व त्याने त्यास चांगलें बक्षीस दिले. त्या खेळांत मदन स्त्रीवेप घेऊन नाचत असे, सांब मृदंग वाजवीत असे, गद ताल धरीत असे, आणि भद्रनाम बतावणी करीत असे. तो खेळ पाहून प्रभावतीच्या मनावर कांही निराळाच परिणाम झाला. स्त्रीवेष घेऊन नाचणाऱ्या मदनाकडे ती लक्षपूर्वक पहात असे. मदनाच्या चेहऱ्यांांत आणि नाचणाऱ्या नटाच्या चेहऱ्यांत, साम्य असल्यामुळे, तिला मदनाची वारंवार स्मृति होऊं लागली, व आपला व मदनाचा योग केव्हां घडून येईल असा तिला ध्यास लागला; शिवाय त्या उर्वशी रावणाच्या खेळांत होणारा शृंगार पाहून तर तिला विशेषच त्रास होऊं लागला. ३ रावणाला उर्वशीचा शाप. वैशंपायन याप्रमाणें ● जनमेजयास कथा सांगत असतांना; जनमेजय मध्येच ह्मणाला; महाराज, मला उर्वशी व रावण यांची कथा ऐकण्याची इच्छा झाली आहे, तर ती अगोदर सांगून, मग प्रभावतीची कथा सांगावी.” तेव्हां वैशंपायन बरें ह्मणून, त्यास रावणाची कथा सांगू लागले. " एकदां रावण कुबेराकडे आला असतांना त्याची व उर्वशीची गांठ पडली, कुबेराचा पुत्र नलकुबेर, त्याच्याकडे जाण्यासाठीं ती आली होती. तिला पाहून रावणास कामेच्छा उत्पन्न झाली व तो तिला अडवूं लागला. त्यावेळी तिनें रावणास पुष्कळ समजावून सांगितलें परंतु रावण ऐकेना, तेव्हां उर्वशीनें त्यास ८ तुझ्या मस्तकाचें चूर्ण होईल; ' हाणून शाप दिला. पुढे या नलकुबेरासहि शाप होऊन तो वृक्ष झाला होता. ती कथा अशी आहे की, कुबेराचे दोन पुत्र मणिग्रीव आणि नलकुबेर, हे नदीवर मद्य पिऊन नग्नाव- स्थत स्नानें करीत असतांना तिकडून नारद आले; परंतु ते दोघे मद्यानें बेहोष झालेले असल्यामुळे त्यांनी नारदास वंदन न करितां त्यांचा उपनर्द केला. तेव्हां नारदानें त्यांना शाप दिला की, 'तुम्हीं दोघेहि वृक्ष व्हाल व तुम्हांला श्रीकृष्णाचे हाताचा स्पर्श होईपर्यंत त्याच अवस्थेत रहावे लागेल;' नारदाचा याप्रमाणें शाप होताच ते दोघेहि यमूना नदीच्या कांठी वृक्ष होऊन राहिले; त्या अवस्थेत ते सहस्र संवत्सर होते. पुढे गोकुळांत श्रीकृष्ण परमात्मा लहान असतांना, यशोदेकडे आले, व तिच्या मांडीवर बसून स्तन तोंडांत धरून दूध पिऊं लागले. इतक्यांत चुलीवर तापत ठेवलेलें दूध उत् जाऊं लागलें म्हणून, यशोदेनें कृष्णास खालीं ठेविलें व ती घाईघाईनें दुधाकडे गेली. इतक्यांत कृष्णानें ताकाची माथणी होती, त्यांतून बहुतेक लोणी काढून खाऊन टाकलें, व ताक सांडून टाकलें. ताकाची माधण खाली पडल्यामुळे तिचा मोठा आवाज झाला. तो ऐकून घरांतून यशोदा बाहेर आली; आणि पहाते तो चौहीकडे ताकच ताक झाले असून, घाईघाईनें लोणी खाल्ल्यामुळे