पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] अध्याय ११ वा. राज्य परत घेतलें व तो पुढे आपल्या प्रजेचें पुत्राप्रमाणें संरक्षण करून मुखानें राज्य करूं लागला. याप्रमाणें नळराजाची कथा सांगून, हंसिणी प्रभावतीला ह्मणाली; " प्रभावती, ही नळराजाची कथा - जशी ऐकावयाला मनोरम आहे, तशी ती सर्व पातकांचा नाश करणारी आहे. त्या पुण्यश्लोक नळाच्या चरित्राचें जो मनन करील त्याच्या आपदा व विपदांचा नाश होईल. नळराजा हा परमेश्वराच्या भक्तांत एकनिष्ठ, साधूंत वरिष्ठ आणि सर्व राजांत श्रेष्ठ, असा होऊन गेला आहे. प्रभावती, त्या राजाचा व दमयंतीचा योग, हंसानेंच घडवून आणला. यावरून पक्षीहि किती कार्य करितात याची तूं कल्पना कर. त्या हंसाप्रमाणेंच आम्ही उभयतां तुझा व मदनाचा योग घडवून आणूं.” 66 नळराजाची कथा ऐकल्यावर, जनमेय राजा वैशंपायनाला म्हणाला- " मुनी महाराज, ही मूळ कथा कोणी कोणाला सांगितली आहे, तें ऐक- ण्याची माझी इच्छा आहे." तेव्हां वैशंपायन म्हणाले; 'राजा, पांडव वन- वासांत असतांना, बृहदश्वानें ही कथा धर्मराजास सांगितली आहे. कौरवांनींहि असेच कपटद्यूत खेळून पांडवाचें राज्य हरण केले होतें, व त्यांना वनवासांत पाठवून दिलें होतें. पांडवांना वनवासांत जेव्हां फार कष्ट होऊं लागले, तेव्हां बृहदश्वानें नळराजाची कथा धर्मास सांगून, त्यास असा उपदेश केला कीं, धर्मा, तुला काळजी करण्याचें कांहींच कारण नाहीं. तुम्हीं पांचजण बंधु एका ठिकाणी आहांत. नळराजा तर एकटा होता, त्यानें धैर्य धरून जसे 6 ते दिवस कंटिले, तसे तुझांस कंठण्यास तर कांहींच अशक्य नाहीं. तुम्हां- , बरोबर द्रौपदी आहे, धौम्यादि ऋषि आहेत, तुमचा वनवास नळापेक्षां शतपट बरा आहे. ' याप्रमाणें बृहदश्वानें नळाची हकीकत धर्माला सांगून त्यास धैर्य दिलें. धर्मासहि ती नळाची कथा ऐकून फार समाधान झालें. तीच कथा हंसिणीनें प्रभावतीला सांगितली. आतां प्रभावतीचा व मदनाचा विवाह हंसिणीने कसा लाविला तें मी तुला सांगतों." अध्याय ११ वा. प्रभावती आणि मदन यांचा विवाह. वैशंपायन हाणाले; "हे राजा जनमेजया, याच वेळीं वसुदेवानें एक महा- यज्ञ करण्यास आरंभ केला होता. यज्ञासाठी लागणारें साहित्य स्वतः श्रीकृष्णा भगवान् पुरवीत असल्यामुळे, त्या यज्ञास उणेपणा असा मुळी देखील नव्हता, यासाठी विद्वान, ज्ञानी, पवित्र, 19 तपस्वी असे विश्वामित्र, , .