पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४ [ स्तबक लागली आहे. त्याच्याप्रमाणे हा कोणीकडे निघून जात नाहीं एकदांचा ! विनाकारण भलताच हट्ट घेऊन बसतो !” असें ह्मणून, केशिनी इंद्रसेनास मारूं लागली. त्या वेळी नळाचे डोळे पाण्याने भरून आले, तो त्या दासीचा धरून ह्मणाला; " बाई, तूं अगदींच निर्दय आहस. बिचाऱ्या त्या पोराला कां मारितेस ? नळाला वाईट ग्रह आले, यांत त्याचा काय अपराध ?” असें ह्मणून नळानें केशिनीपासून इंद्रसेनास सोडवून घेतले व त्यास दुसरीकडे घालवून दिलें. दुरून दमयंती हा प्रकार पहात होतीच. त्या वेळीं तिला हा नळ आहे, असा पक्का भरंवसा उत्पन्न झाला. व आपण स्वतः त्याच्या जवळ जाऊन उभे राहिल्यास काय होतें तें पाहण्यासाठीं ती त्याजवळ येऊन उभी राहिली. नळराजा त्यावेळी घोड्याला खरारा करीत होता, पण दमयंतीस पाहिल्यावर त्याची स्थिति कांहीं चमत्कारिक झाली. त्याच्या डोळ्यांतून अश्र वाहू लागले, हातांतला खरारा गळून पडला; आणि तो अधोवदनानें तिच्याकडे पाहूं लागला. यावेळी दमयंती मुद्दाम तें अरण्यांतील अर्धे फाडलेले लुगडें नेसून आली होती. त्या वस्त्राकडे पाहून तर नळाचें हृदय शतशः विदीर्ण होऊन गेलं. तो घोड्याची सुश्रुषा सोडून देऊन, खाली बसला व आपले तोंड दोन्हीं हातांनीं झांकून घेऊन, रडूं लागला. त्यावेळी दमयंतीसहि देहभान राहिले नाहीं. तिनें धांवत जाऊन नळाच्या पायाला घट्ट मिठी घातली व ती त्याला करूण स्वरानें ह्मणाली; मजवर तुझीं रागावून गेलांत, ते मला आज भेटलांत. तुझीं ऋतुपर्ण राजाकडे अहां, असें कळल्यावरून स्वयंवराचें खोटें कारण लावून तुझांस येथे आण." दमयंतीस पाहून नळाच्यानें अधिक वोलवेना. त्यानें कर्कोटक सर्पाचें स्मरण करून, त्यास बोलाविलें. कर्कोटक लागलीच आला व त्यानें नळाच्या शरीरांतील सर्व कृष्णवर्णाचें विष काढून घेतलें. तेव्हां नळ पूर्वीपेक्षांहि अधिक सुंदर व सतेज दिसूं लागला. अशा रीतीनें त्याचा कृष्णवर्ण पालटल्याबरोबर त्यास सर्वांनी ओळखिलें. राजा भीमक व राणी असे उभयतां राजवड्यांतून नळाजवळ आले व त्यांनी त्यास दमयंतीसह राजवाड्यांत आणलें. ऋतुपर्णानें नळास आलिंगन दिलें, व 'तुला न ओळखल्यामुळे सेवावृत्ति करावयाला लाविली याबद्दल क्षमा कर. ह्मणून त्यानें नळाची विनंति केली. मग नळानें आपली हा वेळपर्यंत झालेली सर्व हकीकत सर्वानां सांगितली. तेव्हां सर्वजण नळाच्या शौर्याची, धैर्याची व सत्वाची, वाखाणणी करूं लागले. मग भीमकराजानें ऋतुपर्ण राजास व नळास चार दिवस आपल्या घरी ठेऊन घेऊन मोठा उत्सव केला. नंतर भीमकानें व ऋतुपर्ण राजानें नळास, सैन्याची मदत देऊन, नैषध देशावर लढाईला पाठवून दिले. नळराजानें लवकरच पुष्कराचा पराभव करून, आपले सर्व नैषध देशचें , कथाकल्पतरू.