पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१ लें. ] {{center|अध्याय १० वा. ६३

रथांतून उतरल्यावर, राजा ऋतुपर्ण, बरोबर बाहुकास घेऊन, भीमकराजाचे

राजवाड्यांत गेला. पण तेथें त्याला दमयंतीचें स्वयंवराची कांहींच तयारी दिसली नाहीं. तेव्हां सुदेवानें आपणास असे खोदें कां सांगितलें, याची ऋतुपर्ण राजाला मोठी चुटपूट लागली. तो यासंबंधानें मुदेवास विचारणार देखील होता; पण इतक्यांत राजा भीमक, ऋतुपर्णास सामोरा आला व त्यानें सत्कारानें त्यास राजवाड्यांत नेऊन, आपणाजवळ बसण्यासाठी आसन दिले. एकमेकांनी एकमे- कांस कुशल विचारल्यावर, भीमकानें ऋतुपर्णास कोणीकडे आलांत ह्मणून विचारिलें. तेव्हां ऋतुपर्ण राजा मोठ्या विचारांत पडला. त्यास 'दमयंतीचें स्वयंवरासाठीं आलों' असें स्पष्ट ह्मणतां येईना. मग त्यानें ' सहज आपल्या भेटीला आलों; असें कांहीं तरी सांगून राजाचें समाधान केलें. राजानें त्यास आपल्याच महालांत पाहुणे हाणून ठेवून घेतले व बाहुकास अश्वशाळेत उतरण्यासाठी जागा दिली. याप्रमाणे 'बाहुक' नांव धारण केलेला नळराजा, भीमक राजाकडे आल्यावर, दमयंतीनें केशिनी नांवांच्या एका विश्वासू दासीला त्या बाहुकावर नजर ठेवण्यास सांगितले. तिनें त्या दासीला, नळाच्या विशेष खुणा त्याला अवगत असलेल्या विद्या, त्याचा स्वभाव वगैरे सर्व माहिती देऊन नळाकडे पाठवून दिले. नळानें अश्वशाळेत आपलें बिऱ्हाड लाविल्यावर, केशिनी त्याच्याकडे उत्तम पंचपक्का- नाच्या भोजनाचें ताट घेऊन आली; पण बाहुकानें त्या अन्नाचा स्वीकार न करितां कच्चा शिधा मागितला. तेव्हां केशिनीनें भोजनाचें ताट परत नेऊन, बाहुकाला सर्व शिधा आणून दिला. नळानें तो शिधा घेतला व अश्वशाळेत जाऊन ज्या बाजूला कोणी येणार नाही, अशा ठिकाणी बसून तो स्वयंपाक करू लागला. नळ आपल्या समजुतीप्रमाणे बाजूला जाऊन बसला होता; पण त्याच्याकडे केशिनीची नजर होतीच. नळानें अनिमंत्र झणून अग्नि सिद्ध केला, वरुणाचें आवाहन करण्याबरोबर घागर पाण्यानें तुडंब भरली; अशी तयारी झाल्यावर नळानें स्वयंपाक करून भोजन केलें. केशिनीने हा सर्व प्रकार दमयंतीस जाऊन सांगितला, तेव्हां तो नळच आहे, असे तिनें जाणलें. तथापि आणखी खात्री होण्यासाठी, दमयंतीनें इंद्रसेनास केशिनीजवळ दिले व तिला सांगितलें कीं, 'तूं याला बाहुकाजवळ घेऊन जा, आणि त्याच्यासमक्ष याला रागें भरून मारावयाला लाग, ह्मणजे तो जर नळ असेल तर तुला प्रतिबंध केल्यावांचून राहणार नाहीं.' दमयंतीने असें सांगि- तल्यावर, केशिनी इंद्रसेनास घेऊन, नळाजवळ आली; व त्यास रागें भरूं लागली. ते पाहून नळास फार वाईट वाटले व तो त्या दासीस ह्मणाला; बाई, कां त्या पोराला रागें भरतेस ? " तेव्हां केशिनी ह्मणाली; " बाहुका, हा असाच करंटा आहे. याचा बाप याला कोणीकडे सोडून गेला आहे त्याचा मुळींच पत्ता नाहीं. हा झाल्यापासून त्या नळाच्या मागें सारखी ग्रहदशा ८८