पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६२ |

}}कथाकल्पतरू.

[ स्तबक


अश्वशाळेंत आहेत.'? मग बाहुकानें अश्वशाळेंत जाऊन दोन उत्तम पण रोडके घोडे शोधून आणले, व रथ जोडून तयार केला. रथाला जोडलेले रोडके घोडे पाहून ऋतुपर्ण राजा हाणाला; बाहुका, हे रोडके घोडे एवढा लांब पल्ला कसा गांठतील १" बाहुक ह्मणाला; महाराज, हे घोडे जरी रोडके आहेत, तरी ते खरे जातीवंत आहेत. हे शतयोजनें सहज जातील." बाहुकानें याप्रमाणे राजास धैर्य दिल्यावर, राजा आपणा बरोबर सुदैव पुरोहित यास घेऊन रथांत बसला, व बाहुकास रथ ' हांक' ह्मणून ह्मणाला.

५ नळ व दमयंती यांची भेट.

राजाची आज्ञा होण्याबरोबर बाहुकानें घोड्यांना इपारत करून, काढण्या सैल

सोडल्या तेव्हां वान्यापेक्षांहि मोठ्या वेगानें रथ चालू लागला. विलक्षण वेगानें रथ चालू लागल्यावर, ऋतुपर्ण राजास आपण वेळेवर जाऊन पोहोंचू असा भरंवसा उत्पन्न झाला. तो बाहुकास प्रोत्साहन देऊन ह्मणाला; बाहुका, तूं इंद्राचा सारथी जो मातली, त्याच्यावरहि मात केलीस. " याप्रमाणे बाहुकास प्रोत्साहन मिळाल्यावर त्यानें आणखी वेगानें रथ चालविला. रथ अतिशय वेगानें चालत असल्यामुळे, वाऱ्याच्या जोरानें राजाच्या खांद्यावरील शेला उडून खाली पडला, त्याबरोबर राजा बाहुकाला 'रथ थांबीव' ह्मणून ह्मणाला. तेव्हां रथ थांबवून बाहुक ह्मणाला; राजा, तो तर एक योजन मागे राहिला आहे." इतक्या विलक्षण वेगानें घोडे चालविण्याचें बाहुकाचें सामर्थ्य पाहून ऋतुपर्ण राजाला फार आश्चर्य वाटलें. तो बाहुकाला ह्मणाला; "बाहुका, तुला जशी अश्वविद्या अवगत आहे, तशी मला अक्षविद्या अवगत आहे. हा जो बिब्याचा वृक्ष आहे, या वृक्षास चवदा शाखा, दाहा हजार एक पाने व एक सहस्त्र पंचाण्णव फळे आहेत. " राजाचें हें बोलणें खरें की खोटें हैं पाहण्यासाठी बाहुक रथाखाली उतरला व त्यानें त्या झाडाच्या शाखा वगैरे मोजून, राजा गणितविद्येत फार निपूण आहे, असे जाणले. नंतर बाहुक राजाला ह्मणाला; महाराज, आपण मला अक्षविद्या द्यावी, मी तुझांला अश्वविद्या देतों’ राजानें ती गोष्ट कबूल केली व नळास अक्षविद्या दिली. नळ- राजास अक्षविद्या प्राप्त होण्याबरोबर त्याच्या शरीरांतून कली बाहेर पडला, व त्या नळाचे पाय धरून ह्मणाला; 66 नळा, मी तुला इतके दिवस छळलें याबद्दल क्षमा कर. तुला छळल्यामुळे माझे सर्व शरीर जळू लागले आहे. आतां तूं दया कर; मला शाप वगैरे देऊं नकोस. तुझी अवदशा आतां संपली असे समज, तुला तुझी स्त्री व मुले ही लवकरच भेटतील. आणि तुझें राज्यहि तुला प्राप्त होईल." असे सांगून कलीने त्या बिब्याच्या झाडांत प्रवेश केला. हा प्रकार ऋतुपर्ण राजास मुळींच कळला नाहीं. मग बाहुक पुन्हा रथावर बसला व त्यानें मोठ्या वेगानें रथ चालवून कौंडण्यपूर गांठले. 6