पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कथाकल्पतरू

[ स्तबक

दमयंती व पुरोहित यांचें तें झालेले बोलणें ऐकून तेथेंच उभ्या असलेल्या

सुनंदा राणीला फार आश्चर्य वाटलें. ती लागलीच आपल्या सासूकडे गेली व ह्मणाली;“सासूबाई, थोड्या दिवसांपूर्वी, आपण ज्या एका तरुण स्त्रीला आपल्या घरीं आणून ठेविलें होतें, ती दुसरी कोणी नसून प्रत्यक्ष दमयंती आहे व तिला नेण्यासाठीं भीमक राजानें आपला पुरोहित पाठविला आहे. " सुनंदेच्या तोंडून ' दमयंती : हीं अक्षरें बाहेर पडल्याबरोबर राजमातेसहि फार आश्चर्य वाटलें; व ती तेथून उटून दमयंती जवळ आली. राजमातेनें दमयंतीस आपल्या हृदयाशीं कुरवा- ळून धरलें, व ती त्या पुरोहिताला ह्मणाली; अहो, ही नळराजाची स्त्री दमयंती आहे, हे मला मुळींच माहीत नव्हते. आणि त्यामुळे हिच्या आदरसत्कारांत जर कांहीं कमी झाले असेल, तर भीमकराजास ह्मणावें त्याबद्दल आह्मांला क्षमा कर. " नंतर राजमाता दमयंतीला हाणाली; " दमयंती, तूं इतके दिवस येथें असून, तूं कोण, तें आह्मांस कळविलें नाहींस ! दमयंती, मजजवळ खरी 66 2 हकीकत सांगावयाला कांहीं हरकत नव्हती; कारण मी तुझी मावशी आहे. भीमकाची स्त्री, ही माझी वडील बहीण होय. आह्नीं दोघी सुदामाच्या मुली, त्यांनी वडील मुलगी भीमकास दिली व मला वीरबाहूस दिली. पुष्कळ दिवस तुला पाहिले नसल्यामुळे मी तुला ओळखिलें नाहीं. दमयंती, आम्हीं तुला न ओळखिल्यामुळे तुला सेवावृत्ति करावयाला लाविली, याबद्दल फार खेद होतो. असो, झालें तें झालें, तूं आतां आपल्या माहेरीं जाणार आहेस, तेव्हां अगोदर घरांत चल, मी आपल्या हातानें तुला अभ्यंगस्नान घालून तुझी वेणी घालते, तुझी खणानारळांनी ओटी भरते; आणि तुला मार्गस्थ करिते. " राजमातेचें हैं बोलणे ऐकून दमयंती म्हणाली; “ माझी व माझ्या पतीची जोपर्यंत गांठ पडणार नाही, तोपर्यंत अभ्यंगस्नान मला करावयाचें नाहीं. तसेंच तोपर्यंत मी आपली वेणीहि घालणार नाही. ज्या स्त्रीला पतीचा सहवास नसून पति कोणत्या दु:खांत, कोणत्या संकटांत असेल याची विवंचना लागली आहे, तिनें असे विलास करणें हें अत्यंत अनुचित होय. मी आपली अशीच आतां आ- पल्या माहेरीं जातें. तुम्हीं इतके दिवस माझा मुलीप्रमाणे सांभाळ केलात, हेंच माझ्यावर तुमचे मोठे उपकार झाले आहेत. " असें म्हणून दमयंतीनें सर्वाचा निरोप घेतला. मग वीरबाहूराजानें दमयंतीस व पुरोहितास बसण्यासाठी आ- पला रथ देऊन त्या दोघांनां भीमकराजाकडे पाठवून दिले. ६० ● कथाकल्पतरू. ४ दमयंतीचे पुन्हा स्वयंवर. आपल्या माहे येऊन, दोन्हीं मुलें कुशल आहेत हे पाहून, दमयंतीस फार आनंद झाला. दमयंतीस कुशल पाहून दमयंतीच्या आईबापालाहि तसाच आनंद झाला. घां आल्याबरोबर दमयंतीस तिची आई म्हणाली; यंती, तें जुने वत्र टाकून दे आणि आतां चांगली चांगली वस्त्रे नेस. १" तेव्हां 66 दम-