पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] ५९. अध्याय १० वा. ३ दमयंतीला भीमकाचें दर्शन. नळराजानें आपली दोन्हीं मुलें भीमक राजाचे घरी पाठवून दिल्यावर भीमक राजास, - नळाने द्यूतांत सर्व गमावून, आतां आपण व बायको असे - उभयता अरण्यांतून वास करीत आहेत, असे वर्तमान कळलें. तेव्हां अर्थातच भीमक राजास फार वाईट वाटलें. आपल्या मुलीची व जांवयाची काय स्थिति असेल, या काळजीनें त्याला अगदीं वेडें करून टाकले होते. तेव्हां भीमक राजाने त्या दोघांचा शोध करण्यासाठी आपले अनेक दूत देशोदेशीं पाठवून दिले; परंतु बरेच दिवस झाले तरी त्यांचा कांहींच शोध लागला नाहीं. तेव्हां राजास असें वाटलें कीं, दोघेहि एकाएकी हीन दशेंत सांपडल्यामुळे लज्जेनें जनसमाजांत वावरत नसतील, निराळी नांवें धारण करून कुठेंतरी दिवस कंठीत असतील. अशा स्थितीत ते असल्यास त्यांचा युक्तीनेंच शोध लाविला पाहिजे. असा विचार करून राजानें सुदेव नांवांच्या एका चाणाक्ष पुरोहितास त्या दोघांच्या शोधासाठी बाहेर देशी पाठवून दिलें. तो सुदेव पुरोहित, स्वामी कार्यासाठी फार तत्पर होता. प्रत्येक ठिकाणी जाऊन बारीक रीतीनें माहिती काढून, नळाचा व दमयंतीचा शोध करूं लागला. अनेक अरण्यें, अनेक देश, अनेक नगरें शोधितां शोधितां तो राजपुरी नांवाच्या शहरांत येऊन पोहोचला. ' कांही दिवसांपूर्वी तेथें एक तरुण स्त्री आली असून ती हल्ली राजवाड्यांत आहे,' असें त्या सुदेवास समजलें. त्याबरोबर तो राजवाड्यांत गेला, व त्यानें युक्तीनें नवीन आलेल्या स्त्रीला अवलोकन केलें. तिला पाहतांच ती दमयंतीच आहे, असें त्यानें तेव्हांच ओळखिले. त्यावेळी सुदेवास एकदम गंहिवर येऊन तो 'दमयंती, दमयंती, ' ह्मणून तिला हाका मारूं लागला. दमयंतीला एकाएकी तिच्या खन्या नांवाने हाका मारल्यामुळे, ती आश्चर्यचकित होऊन गेली, व आपणास ओळखून कोण हाका मारित आहे, हे ती पाहूं लागली. तो आपल्या बापाच्या घरचा सुदेव पुरोहित दिसला ! सुदेव पुरोहित वृद्ध होता व राजाच्या सर्व माणसांवर त्याचे आपल्या मुलांचाळां- प्रमाणे प्रेम होतें. त्या पूज्य पुरोहितास पाहतांच, दमयंतीचें हृदय आनंद क दुःख या दोहों विकारांनी एकदम उचंबळून येऊन तिचे डोळे पाण्याने भरून आले. ती घाईघाईनें पुरोहिताजवळ आली, व त्याच्या पायावर मस्तक ठेवून अश्र गाळू लागली. पुष्कळ दिवसांच्या प्रयत्नानें दमयंती मिळाल्याबद्दल पुरो- हितास साहजिक आनंद झाला होता, त्याने तिला उचलून उभ केले व तिचे डोळे पुसून तो हाणाला, " दमयंती, उगी, रडूं नकोस; तुझा मुलगा इंद्रसेन व मुलगी इंद्रसेनी, दोघेंहि कुशल आहेत. तुझ्या पतीचाहि आह्मीं शोध करीत असून त्याची व तुझी लवकरच गांठ पडेल, तुला आपल्या माहेरी नेण्यासाठी मी मुद्दाम आलो आहे. " 6