पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८ कथाकल्पतरू. २ नळ व ऋतुपर्ण राजा. नळराजा म्हणाला; सर्प गेल्यावर नळराजा लागलाच तेथून निघाला तो अयोध्येस ऋतुपर्ण राजाकडे आला. ऋतुपर्ण राजाने त्यास कोण, काय, तें विचारल्यावर, महाराज, माझें नांव 'बाहुक' असे असून मी अश्वविद्या व पाक निष्पत्ति उत्तम प्रकारें जाणतों. आपली सेवा करावी, या उद्देशानें आपणाकडे आलों आहे." नळाचें तें लीनतेचें भाषण ऐकून, ऋतुपर्ण राजास फार संतोष झाला. त्यास एका चांगल्या सारथ्याची आवश्यकता असल्यामुळे, त्यानें त्या बाहुकास मोठ्या आनंदानें ठेवून घेऊन, आपली सर्व अश्वशाळा त्याच्या स्वाधीन केली. नळराजास अश्वविद्या चांगली अवगत असल्यामुळे, नळानें ऋतुपर्ण राजाची अश्रशाळा लवकरच नांवांरूपाला आणिली. नळराजा तेथे आपल्या हातानें स्वयंपाक करून जेवीत असे. इतर सेवकजन आपणाकडे जेवण्याबद्दल पुष्कळ आग्रह करीत असत; पण दुसऱ्याचें अन्न. खावयाचें नाहीं, असा त्याचा नियम असल्यामुळे, तो प्रत्यहीं रात्रीं स्वतः स्वयं- पाक करून जेवीत असे, रात्रीं निजल्यावर नळराजास स्त्रीपुत्रांची आठवण होऊन, त्याचें हृदय भडभडून येत असे. प्रत्यहीं रात्रीं अंथुरणावर पडला म्हणजे त्याच्या डोळ्यांतून अश्र वहात असत. नळराजाची ती स्थिति, दोन- चार दिवसांच्या सहवासाने तेथील इतर सेवकांच्या ध्यानी आली. एके दिवशीं एक सेवक त्याला म्हणाला; "बाहुका, रोज रात्रीं तूं असे अश्र गाळीत असतोस, याचें कारण काय ?" तेव्हां नळराजा म्हणाला; मित्रा, माझी आणि माझ्या स्त्रीची रानांत मार्ग क्रमीत असतांनां चुकामुक झाली आहे. मी तिला पुष्कळ शोधलें; पण ती मला मुळींच भेटली नाहीं. तिची आठवण झाली म्हणजे, मला साहजिक दुःख होतें. तिची माझ्यावर फार प्रीति आहे. आम्हां उभयता- मध्ये आजपर्यंत कधीहि ताटातूट झाली नव्हती. ती फार सकुमार असून कोवळ्या मनाची आहे. तिची काय स्थिती झाली असेल, तिला खायाला मिळत असेल की नसेल, ती सुखांत असेल की दुःखांत असेल, वगैरे अनेक विचार माझ्या मनामध्यें तिच्याविषयीं येतात. केव्हां केव्हां असें वाटतें कीं, तिला कर श्वापदांनीं खाऊन टाकले असावें, अथवा त्या घोर अरण्यांतल्या कष्टामुळे तिचा अंत झाला असावा; किंवा पतीची भेट होण्याची आतां कांहीं आशा नाहीं असे जाणून तिनें कदाचित आत्महत्याहि केली असेल. असे अनेक विचार माझ्या मनांत येतात. व त्यामुळे दुःख होतें व माझ्या डोळ्यांतून अश्र येतात !” नळराजानें ती सांगितलेली हकीकत ऐकून त्या बाहुकाच्या व्यवसायी बंधूला फार वाईट वाटलें. L [ स्तबक