पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] मी वाटले व त्यासाठी तो त्या अरण्यांतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करूं लागला; परंतु इतक्यांत त्याच्या दृष्टीस अरण्यास वणवा लागलेला दिसला. तें भयंकर अरण्य एकाएकी पेटून, अग्नीच्या ज्वाळा आकाशासी स्पर्धा करूं ला- गल्या ! मोठमोठाले प्रचंड वृक्ष, अग्नीनें जळून कडाकड मोडून पडूं लागले ! तो अपूर्व प्रकार पहात पहात नळ चालला असतांनां, एक प्रचंड सर्प त्यां अमींत होरपळत आहे, असे त्याने पाहिले. त्या सर्पाजवळ नळराजा येतांच तो सर्प दीनस्वरानें म्हणाला; "हे नैषधभूपते नळा, मला या संकटांतून सोडीव; मी तुझे उपकार कर्धीहि विसरणार नाहीं." सर्पाचे ते उद्गार ऐकून, नळास त्याची दया आली व त्यानें त्याला त्या वणव्यांतून बाहेर काढले. सर्प याप्रमाणे त्या अग्नींतून वांचल्यावर नळाला ह्मणाला; " हे राजा, सर्व सपचा नायक असून, माझे नांव कर्कोटक असे आहे. तूं अत्यंत दयाळू आहेस, असें मला माहीत असल्यावरून, मी तुला आपल्या साह्याला बोलाविलें. तूं माझी भीति न बाळगितां मला वांचविलेस हे माझ्यावर तुझे फार उपकार झाले आहेत; पण तुला माझी आणखी एक विनंति आहे. तूं मला पुन्हां उचल आणि एक, दोन, अशी पावलें मोजून दूर नेऊन सोड." नळ . राजानें हें सर्पाचे बोलणे ऐकून लागलीच त्या सर्पाला उचललें व एक, दोन, तीन, अशी पावले टाकित त्याला तो लांब घेऊन जाऊं लागला. इतक्यांत दाहाव्या पावलाच्या वेळीं, राजा ' दहा ' असें म्हणाल्याबरोबर, त्या कर्कोटक सर्पानें राजास दंश केला. सर्पाची ही कृति पाहून, नळराजा घाबरला, व त्यानें त्या सर्पाला खाली टाकून दिले. तेव्हां सर्प म्हणाला; 'राजा, तूं मुळीं देखील भिऊं नकोस. माझ्या विषानें तुला कधीं मृत्यु येणार नाहीं, व कोणत्याहि प्रकारचा व्याधि होणार नाहीं. तसेंच तुला जराहि प्राप्त होणार नाहीं. शिवाय माझें विष तुझ्या शरीरांत भिनल्यामुळे तूं अगदी काळा व कुरूप दिसूं लागला आहेस, तेंहि तुझ्या फायद्याचे आहे. कारण यामुळे, तुला कोणीं ओळखणार नाहीं; व तुला वाटेल तेथें जातां येऊन लोकांत खुशाल हिंडतां फिरतां येईल. तूं आतां अयोध्येस जाऊन तेथील ऋतुपर्ण राजाजवळ नौकर रहा; म्हणजे तुला तुझ्या स्त्रीची व मुलांची लवकर भेट होईल; व तुला तुझें राज्यहि लव- करच प्राप्त होईल. तुला जेव्हां इच्छा होईल, तेव्हां माझें स्मरण कर, म्हणजे मी येऊन आपलें विष तुझ्या शरीरांतून काढून घेईन. तुझ्या शरीरांतलें विष निघाल्यावर तूं पूर्वीपेक्षांहि सुंदर, सतेज व बलवान दिसशील. परंतु नळा, एवढे लक्षांत ठेव, कीं अनकूळ काळ येईपर्यंत, तूं नळ आहेस, असें कोणालाहि सांगू नकोस, आपले नांव ' 'बाहूक' असे सर्वोस सांगत जा. झणजे तुझा कार्यभाग लवकर होईल." याप्रमाणे कर्कोटक सर्पानें नळास उपदेश करून त्यानें त्याला एक सुंदर वस्त्र दिलें, व तो निघून गेला. अध्याय १० वा.