पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरू. [ स्तबक 66 एक दोन दिवस वाट चालल्यावर, ती राजपुरी नांवांच्या एका मोठ्या शहरांत येऊन पोहोंचली. त्या शहरांत वीरबाहू या नांवांचा राजा राज्य करीत होता. त्या राजाची राणी, गांवाबाहेर एका उपवनांत असतांनां तिनें दमयंतीस रस्त्यानें अनवाणी जाताना पाहिलें. तेव्हां राणीला त्या सुंदर पण दुःखी स्त्रीला पाहून तिची दया आली; व तिनें आपल्या दासीला तिच्याकडे पाठवून तिला बोलावून आणलें. राणीनें दमयंतीला बसावयाला आसन दिलें, व ती ह्मणाली; बाईं, तूं अशा तरूण वयांत बरोबर कोणीं पुरुष माणूस न घेतां, अशी एक- टीच हिंडतेस याचें कारण काय ? तूं कांहीं तरी संकटांत असावीस, असे मला वाटतें. " मग दमयंती ह्मणाली, " बाई, मी एक दुर्देवी स्त्री असून, आपल्या पतीचा शोध करीत हिंडत आहे. आज कित्येक दिवस मी एकसारखा शोध करीत आहे. पण अझून मला माझ्या पतीचा शोध लागला नाहीं." हें दमयंतीचे दुःखोद्गार ऐकून ती उदार मनाची राणी ह्मणाली; “बाई, तूं अगदी तरूण आहेस, एकटें हिंडणें मुळींच प्रशस्थ नाहीं; तूं आतां आपल्या पतीविषयीं मुळींच काळजी करूं नको. मी आपले दूत देशोदेशीं पाठवून त्याचा शोध लाविते; तोपर्यंत तूं माझ्या घरीं स्वस्थ रहा. मी तुझा माझ्या मुलीप्रमाणें सांभाळ याप्रमाणें दमयंतीस अश्वासन देऊन राणीनें दमयतीस राजवाड्यांत नेलें व तिचा ती आपल्या मुलीपेक्षांहि अधिक प्रीतीनें सांभाळ करूं लागली. ज्या राणीनें दमयंतीला आश्रय दिला होता तिचें नांव सुनंदा असें होतें. " करीन. " अध्याय १० वा. -DB10000 कर्कोटक सर्प व नळराजा. ही हकीकत सांगितल्यावर हंसिणी प्रभावतीला नळराजाची पुढील कथा सांगू लागली. ती म्हणाली; “ प्रभावती, तो नळराजा दमयंतीला त्या महारण्यांत एकटीच टाकून, तेथून निघाल्यावर त्यास त्याबद्दल अत्यंत अनुताप होऊ लागला; व पुढे काय करावे हे त्याला कळेना. आंगीं वैराग्य घेण्याचा बाणून तो प्रयत्न करीत होता; परंतु स्त्री व मुले यांची त्याला क्षणोक्षणी स्मृति होत होती. तीं कुठे असतील, कशी असतील, काय करीत असतील, असे हजारो विचार त्याच्या हृदयांत उत्पन्न होऊन, त्याचें हृदय दुःखानें जळून जात होतें. तो एवढा धैर्यशाली होता; पण त्यावेळी त्याचे सगळें धैर्य, नाहीसे होऊन तो एखाद्या स्त्रीप्रमाणे दिवसरात्र सारखा अश्रु गाळीत होता. एखाद्या तीर्थ- क्षेत्राचें ठिकाणी जाऊन, साधुसमागमांत आयुष्य घालवावें, असें नळराजाला