पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] अध्याय ९ वा.. चालली. दमयंती त्या भयंकर अरण्यांतून मार्गक्रमीत असतांनां व्याघ्रसिंहादि- क्रूर पशूंनां देखील दमयंतीची ती करुणाजनक स्थिति बघून, दया येई व ते आपले स्वभावधर्म विसरून जाऊन, त्या माउलीस त्रास न देतां वाट देत. त्या अरण्यांतील तो भयंकर मार्ग कांही दिवस मार्ग क्रमिल्यावर, दमयंती अरण्याच्या बाहेर पडून, एका नदीचें काठी आली. त्या नदीचें तीरावर अनेक आश्रम असून भृगु वसिष्ठादि ऋषि तपश्चर्या करीत बसले होते. तो ऋषींचा रम्य आश्रम पाहून, दमयंतीला एक प्रकारचें धैर्य उत्पन्न झाले. तिनं त्या पुण्याश्रमांत जाऊन सर्व ऋषींना वंदन केलें, व आपली एकंदर हकीकत त्यांना कळवून आपल्या संकटाचें परिमार्जन कशानें होईल हाणून विचारलें. ४ दमयंती व सुवंदा यांची भेट. ऋपींनां दमयंतीची ती हकीकत ऐकून फार दया आली. त्यांनी तिला अगोदर स्नान करण्यास सांगून, तिला नवीं वस्त्रे नेसावयास दिलीं, व कंद- मूलांचा प्रसाद खाण्यासाठी दिला. नंतर ते ऋषि दमयंतीला ह्मणाले, " बाई दमयंती, तूं नळाविषयीं कांहीं देखील काळजी करूं नको. तो कुशल असून, तुला लवकरच येऊन भेटेल; पण तूं अशी एकटी आहेस, तेव्हां पतीची भेट होईपर्यंत आपल्या माहेरी जाऊन रहा. या आश्रमावरून हा जो रस्ता गेला आहे तो नीट वैदर्भ देशाला गेला आहे. या रस्त्यानें गेलीस ह्मणजे तूं आपल्या बापाच्या घरी जाऊन पोहोंचशील. नळराजास थोडे दिवस वाईट आलेले आहेत; परंतु ते संपल्यावर तुझीं दोघेहि पूर्वीपेक्षां अधिक सुखानें आपल्या ऐश्वर्याचा उपभोग घ्याल. " याप्रमाणें दमयंतीला ऋषींचा आशीर्वाद मिळाल्यावर, ती त्यांना पुन्हां वंदन करून, वैदर्भ देशच्या मार्गाला लागली. मार्ग क्रमित असतांनां, तिला एक व्यापारी लोकांचा तांडा भेटला. अनायासें ती सोबत मिळाल्याबद्दल तिला मोठें समाधान वाटले व ती त्या लोकांच्या सोबतीनें मार्ग ऋमूं लागली. रात्र झाल्यावर त्या व्यापाऱ्यांनी एका मैदानावर आपले विन्हाड ठेविलें, व त स्वयंपाक वगैरे करूं लागले. दमयंतीहि त्यांच्याच आश्रयानें तेथें जवळ बसली होती; पण त्या व्यापाऱ्यांनां तिचा संशय आला, व त्यांनां ही कोणीतरी जादू- टोणा करणारी स्त्री असून, आपला नाश करण्यासाठी आपणावरोवर आली आहे असे वाटले. तेव्हां त्या व्यापारी लोकांच्या मुख्यानें, दमयंतीस तेथून जाण्यास सांगितले. त्यावेळी दमयंतीला फार वाईट वाटले, पण नाइलाज असल्यामुळे बिचारी तेथून उठली व एका झाडाखाली जाऊन निजली. इकडे मध्यरात्रीच्या सुमारास, हत्तीचा मोठा कळप तेथें आला व त्यांनी दांडगाई करून, ते सर्व व्यापारी मारून टाकले. सकाळीं दमयंती त्या मैदानावर जाऊन, पाहते तो सर्व व्यापारी मरून पडलेले तिला दिसले ! व्यापाऱ्यांनी रात्री आपणास आश्रय दिला नाहीं हें एकप्रकारें बरें झालें, असे मानून दमयंती पुढे निघून गेली. ५५