पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरू. [ स्तबक पतीचा ह्मणून शोध लागेना, पुष्कळ वेळ शोध केल्यावर पतीची व आपली ताटातूट खात्रीने झाली, असें तिला कळून आले. त्यावेळी तिचे अंतःकरण दुःखानें करपून गेलं. आपण एकीकडे, पति दुसरीकडे; आणि मुलें तिसरो- कडे, अर्से तिघांस तीन दिशेला करून, दुर्दैवानें पक्का दावा साधला, असें तिला वाटू लागले. खरोखर दमयंतीच्या त्या दुःस्थितीला सीमाच उरली नव्हती असे ह्मटले पाहिजे. विचारी त्या अवस्थेत रडणार तरी किती ! रडून रडून दमयंती इतकी क्लांत झाली कीं, ती आपले देहभान विसरून जाऊन, मूर्छित झाली. दमयंती याप्रमाणें त्या अरण्यांत मूर्छित असतांनां तेथे एक मोठा अजगर आला. त्यास हें कांहीं तरी भक्षच आहे असे वाटलें व त्यानें दमयंतीस आपल्या पोटांत घेण्यास आरंभ केला. तिला त्या प्रचंड अजगरानें बहुतेक गिळून, तिचे पाय फक्त गिळावयाचे ठेविले होते; इतक्यांत तेथें जवळच शिकार करीत असलेल्या एका पारध्याची दृष्टि, त्या अजगराकडे गेली. तो विलक्षण प्रकार पाहून, त्या पारध्याला दमयंतीची दया आली; व त्यानें त्या अजगरास युक्तीनें मारून, तिच्या पोटांतून दमयंतीस बाहेर काढलें. नंतर तो दमयंतीम एका नदीचे कांठीं घेऊन गेला व तिच्या अंगाला अज- गराचें लागलेले गरल त्यानें धुवून टाकले आणि तिला सावध केलें. दमयंती सावध झाल्यावर तो पारधी तिला म्हणाला, ' हे स्त्रिये, तूं कोण आहेस ? व अशी या भयंकर अरण्यांत कां हिंडतेस ? तेव्हां दमयंती म्हणाली; पारव्या, मी नैषधपति जो नळराजा, त्याची स्त्री असून, त्याचा या वनांत शोध करीत आहे. " दमयंती त्या संकटपरंपरेनें इतकी गांजली होती तरी, ती जात्याच सौंदर्यवान असल्यामुळे, त्या विपन्नावस्थेतही मोहकच दिसत होती. बा 66 इतकी सुंदर, त्यांतून निःसाह्य दमयंतीला पाहून, त्या नीच पारध्याच्या मनांत तिजविषयी पापवासना उत्पन्न झाली; व तो कामातुर होऊन तिजबरोबर बोलू लागला. तेव्हां दमयंती त्याला ह्मणाली; बा पारध्या, नळराजावांचून जितके पुरूष आहेत, तितके खर्व मला आपल्या बापाप्रमाणे आहेत. त्यांतून तूं मला प्राणदान दिले आहेस; म्हणून तुला तर मी आपल्या जन्मदात्या पित्या- पेक्षांहि अधिक पूज्य मानते. निःसाह्य अशा लहान अर्भकांचा, व संकटांत सांपडलेल्या अबलांचा, जो सांभाळ करितो; त्याची योग्यता पित्यापेक्षांहि अधिक आहे. तेव्हां तूं मनांत आणलेली पापबुद्धि सोड व मला आपल्या कन्येप्रमाणें समज. " दमयंतीनें त्या पारध्याला केलेला तो हितोपदेश रुचला नाहीं. काम- वासनेनें अंध झालेला तो उन्मत्त पारधी, दमयंती एकटी व एकांतांत आहे असे पाहून, तिला त्रास देऊ लागला. तेव्हां दमयंतीनें निरुपाय होऊन, त्या पारध्याला ' तुझें भस्म होवो, ' ह्मणून शाप दिला. त्याबरोबर तो दुर्मति जळून खाक झाला. नंतर दमयंती तेथून निघाली व पतीचा शोध करीत करीत पुढे