पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] अध्याय ९ वा. ५३ 6 'निष्काळजी झाली होती व त्यामुळे ती आपल्या पतिसन्निध सुखानें झोंपी गेली; परंतु नळास काळजीमुळे झोप येईना. आपल्या दुर्दैवाचे तडाखे आपण एकट्यानेंच सोसणें वाजवी असून, आपली स्त्री आपणाबरोबर निष्कारण दुःख भोगीत आहे, असें त्याला वाटू लागलें. तो आपल्या मनांत म्हणाला; ‘ ज्या दमयंतीला ऊन कसें तें माहीत नव्हतें, तिनें आतां काय सारा दिवस उन्हांत रखडत हिंडावें ! पालखी-मेण्यावांचून जी घराच्या बाहेर पडत नसे, तिनें आतां काय अनवाणी हिंडून, पायांत कांट्यांनां आश्रय द्यावा ! ! मृदुशय्येवर जी नेहमी लोळत असे, तिनें आतां काय तृणावर निजावें ! ! ! जी आपल्या अन्नसत्रांत हजारों लोकांनां अन्नदानानें संतोषित करीत असे, तिला आतां उपास करण्याचा प्रसंग यावा ! ! अशा प्रकारचे अनेक विचार नळाच्या हृदयांत उत्पन्न होऊन त्यास फार दुःख होऊं लागलें. दमयंतीची या संकटांतून मुक्तता करण्याचा त्याला कांहींच मार्ग दिसेना. शेवटी त्यानें असें ठरविलें कीं, हिला आपण सोडून जावें, म्हणजे ही कंटाळून आपले बापाचे घरीं जाईल आणि तेथे गेल्यावर सुखानें राहील. , नळराजास हा विचार पसंत पडल्यावर तो हळूच उठला; आणि मोठ्या कष्टानें आपल्या स्त्रीला त्या भयंकर रानांत एकटीच टाकून, आपण निघून गेला. ३ वनवासी दमयंती. इकडे प्रभातकाळ झाल्यावर, दमयंती जागी होऊन पाहते तो पर्णकुटिकेंत पति नाहीं. त्याबरोबर तिच्या पोटांत एकदम चर्र झालें. संकटावस्थेत असा कांहीं प्रकार झाला म्हणजे मनाची धांव प्रथम वाईट विचारावर जाते, तीच अवस्था यावेळी दमयंतीची झाली. आपला पति पर्णकुटिकेच्या बाहेर असेल असें वाटल्यावरून ती बाहेर आली, व आपल्या पतीला शोधूं लागली. परंतु घटका दोन घटका निघून गेल्या तरी पतीचा शोध लागेना, तेव्हां ती फारच हताश झाली; व आपल्या पतीसाठीं दीनस्वरानें त्या अरण्यांत आक्रोश करूं लागली. आपले सर्वस्व समजत असे. दमयंती आपल्या पतीला आपले भूषण, आपल तिची पतीवर बिलक्षण पतिसेवा हेंच ती आपले कर्तव्य समजत असे, ऐश्वर्य, आपले सुख, सर्व काय तें पति; इतकी भक्ति होती. पतीला ती आपले दैवत समजत असे, पतीचे दर्शन हाच प्रसाद; आणि पतीची पूजा हेच पुण्यकर्म, अशी तिची दृढ भावना झालेली होती. त्या साध्वीला तिच्या पतीनें अशा विपद प्रसंगी सोडल्यावर, त्या दमयंतीच्या मनाची काय स्थिति झाली असेल, याची कल्पना करणेंहि दुष्कर होय. दमयंती त्या भयंकर अरण्यांत ' अहो नैषधपति नळराज, असें ह्मणून, सारखा टाहो फोडित सैरावैरा हिंडत होती; पण नळराजा तिच्या दृष्टीस पडेना. ' प्रति पति ' ह्मणून, ती त्या अरण्यांत एकसारखी फिरत होती; पण तिला