पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२ कथाकल्पतरू लागतील असें पक्षी मंदगतीने चालत असल्यामुळे, ते सहज हातीं वाटलें, पण ते धरण्याचें त्याच्याजवळ कांहींच साधन नसल्यामुळे ते पक्षी कसे धरावेत हे त्याला मुळींच कळेना. मग राजानें आपलें नेसलेलें वस्त्र सोडले व हळूंच त्या पक्षांच्या मार्गे जाऊन, ते त्यांच्या अंगावर फेकले. इतक्यांत ते पक्षी ते वस्त्र घेऊन आकाशमार्गाने मोठ्या वेगानें निघून गेले. हे पाहून नळराजाची अवस्था मोठी कठीण झाली. भक्षापरी भक्ष गेलें, आणि जवळ जें लज्जा रक्षणासाठी एक वस्त्र होतें तैं वस्त्रहि गेलें; अशी त्याची चमत्कारीक स्थिति झाली. तेवढ्या एकाच वस्त्रावर तो लज्जेचें रक्षण व थंडीतापाचें निवारण करीत होता. तें त्याचें वस्त्र गेल्यावर द्यूतांत राज्य गमावण्यापेक्षांहि त्यास त्यावेळी अधिक दुःख झालें. पुन्हां आपणांस कोणी अशा नग्नावस्थेत पाहील की काय, "अशी त्याला भीति उत्पन्न झाली. अशा शोचनीय अवस्थेत नळराजा झाडाच्या आडून आडून भक्ष शोधीत हिंडत असतांना, त्या अरण्यांत त्याचा शोध करीत फिरत असलेली दमयंती, त्याच्याकडे आली. तिला पाहिल्याबरोबर तो एवढा धैर्यशाली नळराजा, त्यावेळी डोळ्यांतून अश्र गाळू लागला. तो तिला म्हणाला; " दमयंती, तूं आपली आतां माहेरी जाऊन रहा. मजवर आतां चहूंकडून नाहीं नाहीं ती संकटे येऊ लागली आहेत. दोन पक्षी येथे चरत होते, त्यांनां धरून क्षुधा शांत करावी, म्हणून मीं आपलें वस्त्र सोडलें- व त्यांच्या आंगावर घातले; पण भक्ष न मिळतां ते पक्षी माझें वस्त्र मात्र घेऊन गेले. यावरून माझें दुर्दैव पुरे ओढवलें आहे असे वाटतें. तेव्हां तूं आतां या आपल्या करंट्या पतीला सोड, आणि आपल्या बापाच्या घरी जाऊन रहा. नळाचे हे शब्द ऐकून, त्या साध्वी दमयंतीचें हृदय विदीर्ण होऊन गेलें. ती आपल्या पतीच्या पायांवर मस्तक ठेवून अश्र गाळित गाळित म्हणाली; प्राण- नाथ, आपण या दासीवर असा राग करूं नका. मला वाटेल तितकें दुःख झाले तरी तें मीं सोसण्यास तयार आहे, पण मला आपल्या पायांपासून अशी दूर करूं नका. तुम्हीं या कष्टकारक अवस्थेबद्दल मुळी देखील काळजी करूं नका. आपण एखाद्या तीर्थक्षेत्राचें ठिकाणी जाऊं, व तेथें ईश्वराची सेवा करून आयुष्याचे दिवस कंठूं. मी तेथे मोलमजुरी करून कांहीं तरी मिळवीन, आणि त्यावर आपण कसे तरी उपजीवन करूं. " असें सांगून दमयंतीनें आपलें अर्धवस्त्र फाडून, आपल्या पतीला नेसावयाला दिले. नळराजाला आपल्या स्त्रीचें म्हणणें रुचलें, व ते दोघेहि एखाद्या तीर्थावर जाण्याच्या उद्देशानें निघाले. कांहीं मार्ग क्रमून गेल्यावर त्यांच्या दृष्टीस एक पर्णकुटिका पडली. दोघेहिं कित्येक दिवसाचे उपाशी होते, शिवाय वाटेनें चालण्याचे श्रमहि त्यांनां बरेच झाले होते. म्हणून दोघेहि त्या रिकाम्या असलेल्या पर्णकुटिकेंत जाऊन, त्या रात्रीं तेथेंच निजले, दमयंतीस आपला पति भेटला असल्यामुळे, ती कांहींशी 66 [ स्तबक