पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] अध्याय ९ वा. ५१ तुझांसाठी तुमच्या बरोबर विवाह केला आहे. तुझी सार्वभौम राजे, तुह्मी ऐश्वर्य शाली; हाणून कांहीं मी आपल्या कंठांत माळ घातली नाही. तुमचा सहवास हेंच मी आपले सर्वस्व समजतें, तेंच माझें सर्व सुख होय. मी जशी सुखाची, तशीच दुःखाचीहि पण वाटेकरीण आहे. मी तुमच्या पासून दूर अशी क्षणभरहि होणार नाहीं," याप्रमाणें दमयंतीचा निश्चय पाहूनं नळराजास तशा संकटावस्थेतहि फार समाधान वाटलें व तो तिला बरोबर घेऊन अरण्यांत निघून गेला. कांहीं कंदमुळे सांपडल्यास खावत, न मिळाल्यास उपाशींच रहावें, रात्री एकेका वस्त्रावर कुठे तरी अंग टाकावें, असा त्या दोघांचा क्रम त्या अरण्यांत चालला होता. एके दिवशीं राजानें नदीवर जाऊन, कांहीं मासे मारून आणले व ते स्त्रीजवळ शिजविण्यासाठी दिले. तेव्हां दमयंती ते मासे नदीतिरीं धुण्यासाठी घेऊन गेली व जेथे चांगलें पाणी होतें तेथें धूत बसली, परंतु त्या माशांनां दमयंतीचा हात लागल्यावर एक निराळाच चमत्कार घडून आला. दमयंतीच्या हातांत अमृत असल्यामुळें, ते मृत झालेले मासे दमयंतीच्या हस्तस्पर्शाबरोबर जिवंत झाले व नदींत निघून गेले. तो प्रकार पाहून दमयंती · अत्यंत विस्मित व दुःखीत झाली. दमयंती त्या वेळीं वनवासाच्या दुःखभाराने वेडी झालेली असल्यामुळे, तिला त्या चमत्काराचें कारण उमगलें नाहीं. ती आपल्या पतीकडे आली, व डोळ्यांत अश्र आणून- ' मासे जिवंत होऊन, पुन्हां नदींत निघून गेले;’–ह्मणून सांगू लागली. परंतु नळराजाचा त्या गोष्टीवर मुळींच विश्वास बसला नाहीं. क्षुधाशांत करण्यासाठी ते आपल्या स्त्रीनेंच आपणास फसवून खाल्ले, अशी त्याची दृढ भावना झाली, व तो त्यावेळी दमयंतीस रागानें अपशब्द बोलून तिला एकटीच सोडून रानांत निघून गेला. २ नळ व दमयंती यांची ताटातूट. पतीला भलताच आलेला संशय पाहून, दमयंतीला फार वाईट वाटलें. तिनें नळराजाला पुष्कळ समजावून सांगितलें होतें; पण त्यास तें खरें न वाटतां तो उलट 'संकटसमयीं स्त्रीदेखील कामाला येत नाहीं, असें म्हणाला, व निघून गेला त्यायोगें दमयंतीस आकाश अंगावर कोसळून पडावें असें दुःख झालें. त्या दुःख भारानें ती अगदीं वेडी झाली. आपण कोठे आहों, काय करीत आहों, हे तिला कांहींच कळेना. तो दुःखाचा वेग गेल्यावर तिचें चित्त जरा स्थीर झालें; पण त्याबरोबर लागलीच आपला पति आपणास सोडून गेला आहे, हे तिच्या लक्षांत आलें, व ती पुन्हां दुःखानें क्लांत होऊन, रानांत आपल्या पतीच्या शोधार्थ फिरूं लागली. इकडे नळराजा दमयंतीवर संतापून, एका घोर अरण्यांत गेला; क्षुधा शांत करण्यासाठी काय करावें, या विचारानें त्याला अगदी भंडावून सोडिलें होतें; इतक्यांत त्याची दृष्टी दोन पक्षांकडे गेली. तेव्हां ते दोन्ही पक्षी धरून खाऊन टाकावेत, अशी राजाला इच्छा उत्पन्न झाली. ते दोन्ही