पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरू. [ स्तबक 66 झालें; पण पुष्करा, तुझ्याजवळ द्यूतांत पण लावण्यासाठी काय आहे ?" हा पहा, मी पुष्कर म्हणाला; एक बैल घेऊन आलो आहे, हा मी हारलों तर स्वतः पणाला बसेन; व त्यांतहि हरलों तर तुझी जन्मभर सेवा करून राहीन. " तें लाचें ह्मणणे नळानें मान्य केलें. मग दोघेहि सोंगट्या व फासे घेऊन द्यूत खेळावयाला बसले. दोघेहि आपआपल्या समजुतीप्रमाणे मोठ्या हुषा- रीनें फासे टाकीत असत; पण फासे हलविण्याचें काम कली अदृश्यपणे करीत असल्यामुळे, पुष्कर जिंकूं लागला, व नळराजा गमावूं लागला. असें होतां होतां नळानें सर्व संपत्ति, राज्य, राजमंदिर, वस्त्रे, सैन्य वगैरे पणाला लावून थोड्याच वेळांत तो अगदी निष्कांचन झाला. जवळ कांहीं एक न राहिल्यावर नळ द्यूतांत मुलें व स्त्री हीं लावूं लागला; तेव्हां नळराजाच्या प्रधानानें नळास तेथून उठवून बाहेर आणलें. अशा रीतीनें द्यूत पुरें झाल्यावर पुष्करानें आपल्या नांवाची सर्वत्र द्वाही फिरवून, आपण सिंहासनावर बसला. मग त्यानें राजानळ, त्याची स्त्री व मुळे यांची सर्व वस्त्रे व अलंकार काढून घेऊन, त्यांनां एकेक वस्त्र दिलें व नगराच्या बाहेर घालवून दिले. त्यांनां पोहोचविण्यासाठी त्याचा पूर्वीचा प्रधान आला होता. तो नळराजाला ह्मणाला; 'प्रभु, आपली जरी अशी स्थिति झाली आहे, तरी आपण येथे निश्चितपणे रहावें, मी आपल्या खाण्या- पिण्याची सर्व व्यवस्था करितों." परंतु नळराजानें त्या म्हणण्याचा स्वीकार केला नाही. तो म्हणाला; परान्न घेणें हें अत्यंत अनुचित होय. आम्ही कांहीतरी श्रम करून, वनांतील कंदमूळांवर दिवस काढू; तुम्हीं नगरांत जाऊन स्वस्थ रहावें. ” याप्रमाणे प्रधानास निरोप देऊन, राजा स्त्रीपुत्रांसह पाय पायी अरण्यांत मार्ग क्रमूं लागला. तेव्हां दमयंती ह्मणाली; आपण सर्वजण माझे माहेरी जाऊन राहूं. माझा बाप भीमकराजा, आपणां सर्वांचा चांगल्या रीतीने सांभाळ करील." परंतु नळराजास तीहि गोष्ट मानवली नाहीं. तो ह्मणाला; दुर्दशा प्राप्त झाली असतां, आप्त व सोयरे यांच्या साह्याची कधींहि अपेक्षा बाळगूं नये. जो श्वशुराचे घरी राहून स्त्री आधीन होतो तो निश्चयानें नरकांत जातो. म्हणून आपणांस भीमकाचें घरीं मुळींच राहतां येणार नाहीं. " असें नळाने सांगितल्यावर दमयंतीचा अगदींच नाइ- लाज झाला, मग तिनें दोन्हीं मुलें तरी निदान माहेरी पाठवावीं म्हणून आपल्या पतीची विनंति केली. ती विनंति नळाने मान्य केली, व आपल्या दोन्ही मुलानां भीमक राजाकडे पोहोंचतें केले. त्याचवेळी नळानें दमयंतीस सांगितले की, 'तुंहि आपल्या माहेरी जाऊन रहा. मी माझ्या हातानें या दुर्दशत सांपडलों आहे, तेव्हां हीं कडूं फळे मला एकट्यालाच भोगूं दे." परंतु ती गोष्ट दमयंतीने मान्य केली नाहीं. ती हाणाली; माझा आत्मा, आपणांजवळ आहे, तेव्हां हैं शरीर तरी तुमच्यापासून दूर ठेवण्यांत काय अर्थ ? मी केवळ 66 66 66 66 ५०