पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] अध्याय ९ वा. अध्याय ९ वा. ४९ ९ नळ विडंबना. हंसिणीनें सांगितलेली नळदमयंती स्वयंवराची कथा ऐकून, प्रभावतीला नळ- राजाची पुढील कथा ऐकण्याची इच्छा झाली. ती हंसिणीला म्हणाली; गडे हंक्षिणी, मला नळराजाची सर्व कथा ऐकावी अशी इच्छा आहे, तर मला ती कथा सांग. " अशी प्रभावतीनें हंसिणीला विनंति केल्यावर, हंसिणी तिला नळाची कलीनें कशी विडंबना केली; तें सांगू लागली. हंसिणी म्हणाली; “ प्रभावती, जोपर्यंत नळराजा अत्यंत शुचिर्भूतपणें वागत होता, तोपर्यंत कलीला आपला प्रभाव मुळींच दाखवितां येईना; परंतु एके दिवशीं नळराजास शौच्याहून आल्यावर हातपाय धुवून आचमन करण्याची आठवण राहिली नाहीं. तेवढ्या अमंगळपणाची संधी गांठून, त्या कलीनें नळराजाचे शरीरांत प्रवेश केला; व त्याचें पवित्र अंतःकरण मलीन करून त्याचे शुद्ध बुद्धींत पालट उत्पन्न केला. अशा रीतीनें कलीच्या तावडीत नळ राजा सांपडल्यावर हळूहळू राजाचा पुण्यकर्माकडील ओढा कमी होऊन, असदाचरणानें वाग- ण्याची त्यास बुद्धि होऊं लागली. अंतःकरणांत कांहीं चमत्कारिक विचार उत्पन्न झाल्यामुळे राज्यकारभारात त्याचें लक्ष कमी झालें, प्रजाजनाविषयींची कळकळ कमी झाली, साधुजनांविषयींचा आदर कमी झाला; इतकेंच नव्हें तर स्वतःच्या स्त्रीपुत्रांवरील प्रेम देखील कमी झालं, नेहमीं सोंगट्या व फासे ● घेऊन द्यूत खेळत बसावें, असें त्या नळराजाला वाटू लागलें. कलीनें इतकी तयारी केल्यावर, त्याच नळराजाच्या नगरीत पुष्कर या नांवाचा एक नळा- चाच गोत्रज होता, त्याच्याकडे कली जाऊन म्हणाला; पुष्करा, तूं नळाकडे जाऊन जर द्यूत खेळशील, तर तुला त्यांत त्याचे सर्व राज्य मिळवून देण्याची मी व्यवस्था करितों." तेव्हां पुष्कर म्हणाला; " मी तर अत्यंत दरिद्री मनुष्य आहे; मी नळराजाबरोबर द्यूत खेळण्यास असमर्थ आहे; कारण मजजवळ द्यूतांत पण लावण्यासाठीं कांहीं देखील नाहीं. " तेव्हां कली त्या पुष्कराला म्हणाला; "अरे, मी तुला एक बैल देतों. तो बैल तूं प्रथम पणांत लाव, म्हणजे झालें. त्या एका बैलावर तुला नळाचें सर्व कांहीं प्राप्त होईल. " याप्रमाणें पुष्करास कलीनें सांगितल्यावर तो नळा बरोबर द्यूत खेळण्यास तयार झाला. मग पुष्कर आपणाबरोबर एक बैल घेऊन, नळराजाकडे गेला; व त्यास आपण द्यूत खेळण्यासाठी आलो आहों,' असें त्यानें कळविलें. नळराजास ते त्याचे शब्द ऐकून, फार आनंद झाला. " तो म्हणाला; , कोणाबरोबर द्यूत खेळावें अशी होती; इतक्यांत तूं " माझीहि इच्छा आलास हें बरें