पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ कथाकल्पतरू. [ स्तबक मग भीमकानें यथाविधी वरपूजा करून, दमयंती नळास अर्पण केली. चार दिवस लग्नोत्सव करून, आलेल्या सर्व राजांचा योग्य आदर- सत्कार केला. त्या चौघा दिक्पाळांनांहि त्या प्रसंगीं फार आनंद झाला. आम्हीं संकटसमयीं तुझें रक्षण करूं, म्हणून चौघांनीं नळराजास आश्वासन दिलें, वरुणानें त्यास जलशक्ति दिली, अग्नीनें अग्निशक्ति दिली, यमानें अश्वविद्या दिली, आणि इंद्रानें अदृश्यत्व देऊन, शिवाय कंठांतील माळ दिली, व त्याचा बहुमान केला. भीमकानें त्यावेळी, याचकांनां विपूल दानें देऊन, संतोषित केले. स्वयंवर होऊन गेल्यावर इंद्र वरुणांदि दिक्पाळ, स्वर्गात परत जात असतांनां, त्यानां वाटेंत द्वापार व कलि असे उभयतां भेटले. एकमेकांचें कुशल विचारणें झाल्यावर, इंद्र त्यांना म्हणाला; 'तुम्हीं उभयतां कोणीकडे जाण्यासाठी निघाला आहांत ? ' तेव्हां कली म्हणाला; ' दमयंतीचें स्वयंवर होत आहे, असें ऐकिल्यावरून तिकडे जात आहोत, ती फारच सुंदर आहे, असें ऐकतों. तेव्हां तिची लालसा धरून चाललों आहों. ' हें ऐकून इंद्र हंसला, व म्हणाला; वेड्यांनो, तिचें स्वयंवर होऊनहि गेलें. आम्ही तिच्या स्वयंवरासाठींच गेलो होतों; पण आम्हांपैकी कोणा- सहि न वरितां, नैषध देशचा राजा नळ यास तिनें वरिलें.' हे ऐकून कली ह्मणाला, ' अर्से काय ? तिनें तुम्हां सुरवरांना टाकून त्या नळाला वरिलें हें खरोखर आश्चर्य होय !' नंतर दिक्पाळ निघून गेले. द्वापारहि आपले गृहीं परत गेला, पण कलीस त्याच्या स्वभावधर्माप्रमाणे फार वाईट वाटलें, व आपल्या हातची दमयंती गेली, हाणून त्या दोघांचा शक्य तितका छळ करण्याचे त्यानें ठरविलें. संधी आल्याबरोबर दोघांनगहे संकटांत ढकलावयास सांपडावें हाणून तो दुष्ट कली, नळाबरोबर नेहमीं गुप्तपणे वास करूं लागला. 6 , लग्नसोहळा संपूर्ण झाल्यावर भीमकानें जांवयास विपूल संपत्ति, रत्नें, हत्ती, घोडे, रथ, वगैरे देऊन कन्येसह मार्गस्थ केलें: तो नैषध देशचा नळराजा आपल्या नगरीस सुखरूपपणे परत आला, व आनंदानें राज्य करूं लागला. त्यांस कांही दिवसांनी एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली. मुलाचें नांव इंद्रसेन व मुलीचें नांव इंद्रसेनी असें ठेविलें होतें. तो राजा स्वतः अत्यंत शुचिर्भूत राहून आपल्या प्रजेचें पालन पुत्रवत् करीत अस ल्यामुळे, बारावर्षेपर्यंत कलीस त्याला त्रास देण्यास मुळींच सवड मिळाली नाही. पण पुढे नळ राजाच्या हातून कांहीं चूक झाल्यामुळे कलीनें त्या दोघांचा फार छळ केला. तथापि, त्यामुळे नळाच्या कीर्तीत भर पडली, व दमयंतचें पतिप्रेम सगळ्या जगाच्या निदर्शनास आले.