पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] आहेत. अर्थात् माझे लग्न नळावरोबर झाल्यासारखेंच आहे; तेव्हां लग्न झालेल्या स्त्रीजवळ लग्नासंबंधानें कांहीं बोलूं नये हें बरें. आतां जर माझ्या दुर्भाग्यानें नळराजानेंच माझा अव्हेर केला, तर मी प्राणत्याग करून घेईन, पण अन्य पुरुषाचें मुखावलोकनहि करणार नाहीं. " नळराजा हें दमयंतीचें बोलणं ऐकुन म्हणाला; दमयंती, तूं प्राणत्याग केलास तर त्यांत फायदा तो काय ? तूं विष खाऊन देहत्याग केल्यास, यम तुला घेऊन जाईल. तो यम प्रत्यक्ष आतांच तुझा स्वीकार करण्यासाठी येत आहे. पाण्यांत उडी मारलीस, तर वरुण नेईल. तो वरुणहि पण येणार आहे. शस्त्र घात करून घेतल्यास इंद्र घेऊन जाईल तो इंद्र तुला वरायाला स्वतःच आला आहे. अग्नीत पडून मरूं ह्मणशील, तर अनी स्वतःच आलेला आहे. हे चौघेजण मेल्यावरहि सोडीत नाहींत. मग आतांच त्यांनां कां वरीत नाहींस ? " तेव्हां दमयंती म्हणाली; " तूं म्हणतोस हें खरें, - पण एकदां ज्याला वरिलें आहे, त्यावांचून आतां सर्व मला बापभावाप्रमाणे आहेत; म्हणून ' दमयंती तुझाला माळ घालावयाला तयार नाहीं. असा माझा निरोप तूं त्यांनां स्पष्ट जाऊन कळीव. " दमयंतीचें हे स्पष्ट बोलणे ऐकून, नळराजा तेथून लागलाच निघाला, व दिक्पाळांजवळ येऊन त्यानें झालेली सर्व हकीकत दिक्पाळांना कळविली. दमयंतीचा तो निश्चय बघून त्या चौघांनी निराळीच युक्ति योजिली. स्वयंवराचे दिवशीं त्या चौघांनीहि नळाची रूपें धारण केलीं व ते चौघेहि लग्नमंडपांत येऊन बसले. 66 अध्याय ८ वा. ४ दमयंतीचें स्वयंवर. स्वयंवरांचे दिवश लग्नमंडपांत सर्व राजे, महाराजे, आपआपल्या आसनावर असल्यावर, दमयंती उत्तम प्रकारच्या वस्त्राभरणांनीं सालंकृत होऊन, लग्नमंडपांत आली. ती हातांत माळ घेऊन सर्व राजकुमारावर नजर टाकीत टाकीत लग्न- मंडपांत फिरूं लागली. दमयंतीचें तें अनुपमेय सौंदर्य पाहून, कित्येक राजे तर, आपण स्वयंवरासाठी आलो आहों हें देखील विसरून गेले. कित्येक टकमका दमयंतीकडे पाहूं लागले, व कित्येक कोणाचें भाग्य उदयाला आलें आहे तें शोधूं लागले. हळू हळू लग्नमंडपांत फिरतां फिरतां दमयंती, नळाजवळ आली; पण तेथे एक नळ नसून पांच नळ आहेत, हे पाहून ती फारच गोंधळून गेली. मग तिला दूतांनीं येऊन सांगितलेल्या दिक्पाळांची आठवण झाली व त्यांचेच हें कपट आहे असे तिनें ओळखलें. तिला याबद्दल त्यांचा फार राग आला, व आपला साध्वीपणा यांनां दाखवावा, असा ती विचार करूं लागली. इतक्यांत चौघांहि दिक्पाळांच्या लक्षांत ती गोष्ट आली, व ' न जाणो ही साध्वी शाप देऊन आपली विडंबना करील,' असें वाटून त्या चौघांनींहि आपआपली रूपें प्रगट केलीं. मग दमयंतीनें एकदम धांवत जाऊन नळराजाचें गळ्यांत माळ घातली. त्यावेळी सर्वांनी आनंदानें टाळ्यांचा गजर केला. .