पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरू. [ स्तबक C आल्यास, ती दमयंती याच्याच गळ्यांत खात्रीनें माळ घालील. कारण हा आपणा सर्वोपेक्षांहि सुस्वरूप व उदार दिसत आहे, तेव्हां आतां कांहीं तरी युक्ति योजल्यावांचून कार्यभाग होणार नाहीं.' असा विचार करून त्या चौघानी, नळ राजास तूं कोण, कोटला, वगैरे माहिती विचारून त्याची ओळख करून घेतल्यासारखें दाखविलें, व मग त्यास ह्मणाले; ' हे नळा, आह्मी इंद्र, वरुण, अभि व यम असे चार दिक्पाळ आहोत, आह्नीं दमयंतीच्या स्वयंवरासाठी जात आहोत, तर तूं आह्मांसाठीं दमयंतीकडे जाऊन, ती आझांपैकी कोणाबरोबर विवाह करील अशी शिष्ठाई कर.' हे ऐकून नळ ह्मणाला; 'ही गोठ मी मोठ्या आनंदानें करीन, पण स्वयंवर होणाऱ्या राजकन्येकडे स्वयंवर होण्याच्या अगोदर कोणाहि पुरुषास जाऊं देऊं नये, असा नियम आहे व त्या प्रमाणें भीमक राजाने व्यवस्थाहि केली आहे, तेव्हां तिची भेट होणें, मला तर शक्य दिसत नाहीं.' नळाचें हैं बोलणे ऐकून, इंद्र म्हणाला, नळा, मी तुला अदृश्यपण देतों. म्हणजे तूं कोणासहि दिसणार नाहीस. अशा रीतीनें राजकन्येकडे जाऊन शिठाई कर. पण जर तूं मनांत कपट धरून, राजकन्या स्वतःच मिळविण्याचा प्रयत्न केलास, तर सर्वोच्या दृष्टीस पडशील आणि मग तुझी फार फजिती होईल. ' याप्रमाणे इंद्रानें नळाला बजाविल्यावर त्यास अदृश्यपण देऊन कौंडण्यपुरीं पाठवून दिले. अशा रीतीनें नळ अदृश्य झाल्यावर तो तेथून निर्धास्तपणे निघाला व भीमकराजाच्या वाड्यांत गेला. नळराजा अदृश्य असल्यामुळे थेट राजकन्येच्या महालांत जाईपर्यंत तो कोणासहि दिसला नाही. राजकन्या दमयंती विरहव्यथेनें वेडी होऊन त्या वेळी आपल्या पलंगावर अगदी चिंताक्रांत अशी बसली होती. अशा स्थितींत ती असतांनां नळराजा तिच्या जवळ जाऊन म्हणाला; दमयंती, तूं मोठी भाग्यवान आहेस असे मला वाटतें. मी इंद्र, वरुण, अग्नि व यम यांचा दूत असून त्यांनी मला मुद्दाम तुझ्याकडे पाठविले आहे. ते तुझी लालसा धरून, स्वयंवरासाठी येत आहेत. तेव्हां तूं त्यांच्यापैकीं कोणाहि एकाच्या गळ्यांत माळ घाल. हे पृथ्वीवरील राजे म्हणजे, मृत्यूला केव्हा तरी वश होणारे; अशा मर्त्य मानवांनां वरण्यांपक्षां, कोणातरी एका दिक्पाळास वरणे फार उत्तम होय, आणि ते दिक्पाळ शोधाव- यालाहि तुला मुळींच कांहीं त्रास नाहीं. अनायासे ते तुझ्या घरी स्वयंवरासाठी चालून येत आहेत. त्यांच्यापैकी कोणाहि एकाच्या गळ्यांत माळ घालून तूं धन्य हो. " हे ऐकून दमयंती म्हणाली; या तुझ्या म्हणण्यांत मला कांहीं देखील अर्थ दिसत नाहीं. दिक्पाळांना मृत्यु नाहीं, एवढ्याचसाठी मी त्यांच्या गळ्यांत माळ घालीन, इतकी कांहीं मी वेडी नाहीं. मी आपल्या मनानें नैषध देशचा राजा नळ, यांस वरिलें आहे. माझा आत्मा त्याच्याजवळ असून, शरीर मात्र येथे आहे. मी आपले पंचप्राण राजहंसाबरोबर, कधींच नळाकडे पाठवून दिले 66 66 ४६