पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] अध्याय ८ वा. जसा अधिक पेटतो, त्याप्रमाणे माझी स्थिति झाली आहे. त्याचा व माझा योग कसा घडून येईल ? हें जर तूं सुचवशील, तर मजवर तुझे फार उपकार, होतील. माझें हित व्हावें अशी तुझी इच्छा आहे, तेव्हां याकामी तूं प्रयत्नहि केला पाहिजेस.” दमयंतीचें तें प्रास्ताविक भाषण ऐकून हंसाला मोठा आनंद झाला. तो तिला म्हणाला; " दमयंती, यांत कठिण असें कांहीं नाहीं, तूं आपल्या बापाला सांगून स्वयंवर करण्याचे ठरीव आणि स्वयंवराचे वेळीं नळराजाचे गळ्यांत माळ घाल, म्हणजे झालें. तो तुझ्या स्वयंवराला येईल, अशी मी अवश्य तजवीज करीन. " हंसाचें तें भाषण ऐकून दमयंतीला फार आनंद झाला. ती म्हणाली; हंसा, एवढें कार्य तूं जर करशील, तर तुझें मजवर अनंत उपकार होतील. तूं नळाकडे जाऊन, ते माझा स्वीकार करितील, अशा- प्रकारें त्यांचें मन वळीव. तुला मी आपल्या बंधुप्रमाणे समजतें. मी सर्व विश्वास टाकला आहे. तूं आपल्या या बहिणीचें हैं कार्य करिशील, असा मला भरंवसा आहे " तेव्हां हंस म्हणाला; दमयंती, तूं त्यासंबंधाने कांहीं देखील काळजी करूं नको. मी हा आतांच नळराजाकडे जाऊन, त्यास हें आनंददायक वर्तमान कळवितों. " असें म्हणून हंस लागलाच तेथून उडून आकाशपंथानें निघून गेला. (( तुझ्यावर ३ दिक्पाळांची लालसा. हंस, दमयंती पासून निघून गेल्यावर, दमयंतीची अवस्था नळ राजाच्या विचाराने मोठी चमत्कारिक झाली होती. आपण इतकें तरुण झाली असून, अझून आपल्या विवाहाची आपला बाप कांहींच तजवीज करीत नाहीं; याबद्दल दमयंतीला मोठी चुटपुट लागली होती. बरें बापाजवळ स्वतः गोष्ट काढावी, तर तें अनुचित दिसणार; हाणून दमयंतीनें आपल्या एका सखीकडून आपल्या आईला आपला मनोदय कळविला; आणि आईकडून तो बापाला कळविला. तिचा बाप राजा भीमक, यानें दमयंतीचें तें हाणणें मोठ्या आनंदानें मान्य करून त्याने तिच्या स्वयंवराची लवकरच तयारी केली. स्वयंवराचा दिवस मुकरर करून त्या बेतानें त्यानें सर्व राजपुत्रांनां स्वयंवरास येण्याविषयीं कुंकुम पत्रिका पाठविल्या. सर्वांबरोबर नळराजासहि कुंकुमपत्रिका मिळाली व ती मिळाल्यावर तो उत्साहानें, कौंडण्यपुरास जाण्यासाठी निघाला. स्वर्गात ही गोष्ट इंद्र, वरुण, अग्नि व यम, यांस समजल्यावर, जरी त्यांनां निमंत्रण नव्हते तरी, दमयंतीची लालसा उत्पन्न झाल्यामुळे ते चवघेहि दमयंतीच्या स्वयंवरा- साठी स्वर्गाहून निघाले. पुढे हे सर्व, मार्ग-क्रमण करीत असतांना नळाची व या चौघा दिक्पाळांची रस्त्यांत गांठ पडली. अतुल सौंदर्यराशी नळराजास पाहून, ते चवघेहि दिक्पाळ मनांतल्या मनांत दमयंतीच्या लाभाविषयी साशंक झाले. ते आपसांत एकमेकांना हाणाले; ' अरे, हा नळराजा स्वयंवरास