पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४४ कथाकल्पतरू. [ स्तबक भिऊं नकोस. मी कोणी यक्ष किंवा राक्षस नसून ब्रह्मलोकीं राहणारा हंस आहे. ब्रह्मलोकचे हंस मनुष्याप्रमाणें स्पष्ट बोलतात, हें तुला माहीत नाहीं असे दिसतें. तुझें दर्शन घ्यावें हाणून मी मुद्दाम तुझ्याकडे आली आहे. या भूमंडळावर, तूं अत्यंत रूपवती आहेस, असे समजल्यावरून मला तुझ्या दर्शनाची साहजिक इच्छा झाली, व ह्मणून मी तुजकडे आलों. खरोखर तुझें हें अतुलनीय स्वरूप व ही मनोहर अंगाकृति पाहून, मला आपल्या डोळ्यांचें सार्थक झाल्यासारखें वाटतें. शिवाय तूं सत्वशील, पवित्र व पापभीरू असल्यामुळे तुझ्या हस्त स्पर्शानें मी पुनित झालों, असें मला वाटतें. खरोखर तुला निर्माण करितेवेळी ब्रह्मदेव अगदी एकचित्त होता असे वाटतें. पण दमयंती, अति चांगूलपणा हा देखील वाईटच होय. तुझ्या योग्य तुला जर पति मिळाला तर या सर्व गोष्टीची शोभा, नाहीं तर कावळ्याच्या गळ्यांत माणिक बांधावें त्याप्रमाणें तुझी स्थिति होणार आहे. मी सर्व त्रिभुवनीचे पुरुष पाहिले आहेत, पण त्यांत मला तुझ्या योग्य कोणीहि दिसत नाहीं. अमरावतीचा इंद्र, हा अत्यंत स्वरूपवान आहे हें खरें, पण त्याचें वर्तन बरोबर नाहीं. यमाचे गुण गायला लागावें तर तो निष्ठुर आहे, हें तुला प्रथमच सांगावें लागणार. पृथ्वीवरील भूपाळ तर मला दगडाप्रमाणे गोटे दिसतात. त्यांच्याबरोबर तुझ्यासारख्या कमलिनीचा विवाह होणें, कधींहि श्रेयस्कर होणार नाहीं. परंतु एक अगदी तुझ्या योग्य आहे, असे मला वाटते. त्यानें जर तुझा स्वीकार केला, खरोखरच तूं मोठ्या भाग्याची आहेस असे म्हटले पाहिजे. नैषध- देशचा राजा नळ, यावांचून मला तर तुझ्या योग्य असा कोणीहि दिसत नाहीं. तो अत्यंत सौंदर्यशाली, तरुण व फार पराक्रमी आहे. त्याच्यासारखा सच्चरित्र, सत्वशील, पुण्यवान, प्रेमळ व पवित्र कोणीहि नाही, असे मला वाटतें. तो सर्व शस्त्रास्त्र-विद्येत निपूण असून फार विद्वान आहे. तुझा आणि त्याचा विवाह झाल्यास सुवर्णाच्या कोंदणांत हिरकणी बसवावी, त्याप्रमाणें होणार आहे. मी जातीनें पक्षी आहे, तेव्हां मला या भानगडीत पडण्याचें कांहीं कारणहि नाहीं; पण तुझें तारुण्य, तुझा सुकुमारपणा, तुझी विनयशीलता व तुझी सुशीलता पाहून, तुला तुझ्या योग्य पति मिळावा, असे मला साहजिक वाटतें. मी सर्व ठिकाणीं संचार करीत असल्यामुळे अनेक राजांची मला माहिती आहे, त्यांत नळ हाच एक तुझ्या योग्य वर आहे. म्हणून तूं त्यालाच वरण्याचा प्रयत्न कर." पुरुष मात्र त्या हंसाचें हें बोलणें ऐकून, तारुण्यानें मुसमुसलेल्या दमयंतीला साहजिक कामव्यथा होऊं लागली. ती त्या हंसावर एकदम विश्वास टाकून म्हणाली; " हे हंसा ! त्या नळराजाविषयीं मी देखील ऐकिलें आहे; पण त्याची ही स्थिति मला तूं सांगितली नसतीस तर बरें झालें असतें. हें ऐकिल्यापासून माझी मनोव्यथा अधिक दुणावली आहे. विस्तवावर तूप टाकल्यानें तो न विझतां १ ?