पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लं. ] ४३ आवाजांतील मंजूळ पणा, प्रेमळ व पवित्र नजर, मधूर हास्य; तेंहि तिचें अनु: पमेय आहे. राजा, ती जशी बाहेरून लावण्यलतिका दिसते, त्याप्रमाणे तिचें अंतःकरणहि अत्यंत पवित्र व थोर आहे. तिच्या हृदयांत दयेचा केवळ साग- रच सांठविलेला आहे. असें हें रम्य स्त्री रत्न तूं प्रयत्न करून मिळवावेंस अशी माझी इच्छा आहे. " अध्याय ८ वा. २ हंस संदेश. हंसाने दमयंतीचें केलेलें वर्णन ऐकून, नळराजास, ती मिळविण्याची साह- जिक इच्छा झाली. तेव्हां नळ त्या हंसाला ह्मणाला; 66 हंसा, तूं मजसाठी अशा प्रकारचें स्त्रीरत्न शोधून काढलेंस, याबद्दल मी तुझा फार ऋणी आहे, पण हंसा, यावेळीं तूं माझा दूत होऊन, पुढील कामगिरीहि तूंच केली पाहिजेस. तूं कौंडिण्यपुरीं जाऊन, दमयंतीला भेट; आणि तिला माझा संदेश कळवून, ती मजबरोबरच विवाह करील अशी कांहीं तजवीज कर. मी तुला आपला सखा समजतों, आपल्या मित्रासाठीं तूं शक्य तितकी खटपट करिशील अशी मला खात्री आहे. " नळाच्या तोंडचें हें वाक्य पुरें होतें न होतें तोंच, हंस, राजाची आज्ञा शिरसावंद्य करून, त्याच्या स्कंधावरून उडाला; व मोठ्या वेगानें आकाश मार्ग आक्रमण करून, कौंडण्यपुरास येऊन पोहोचला. नंतर तो कौंडण्यपुरांतील भीमक राजाच्या प्रासादाच्या मागच्या बाजूला, एक विस्तीर्ण व अत्यंत रम्य असें उद्यान होतें; त्या उद्यानांतील एका सरोवराचे कांठीं स्वस्थ विश्रांति घेत बसून, दमयंतीची वाट पाहूं लागला. ऊष्ण काळचे दिवस असल्यामुळे, त्यावेळी दमयंती प्रत्यहि सायंकाळच्या समयीं, त्या उद्या- नांत आपल्या सख्यांसह येत असे. रोजच्या नियमाप्रमाणें त्यादिवशींहि ती त्या उद्यानांत आली असतांनां, प्रथमच तिची नजर - हंसाच्या अपूर्व कांचन कांतीमुळे साहजिक त्या हंसाकडे गेली. हंस त्यावेळी आपण अगदी बेसावध आहो असे दाखवून सरोवराच्या कांठावर बसला होता. हा असा मनोहर सुवर्णाप्रमाणें चमकणारा पक्षी, हाती लागल्यास, आपण त्याला आपल्या सुंदर पिंजऱ्यांत ठेवू.' अशी दमयंतीला इच्छा उत्पन्न होऊन, ती हळूच पाय न वाजवितां त्या हंसाजवळ गेली. आतां ती त्या हंसाला धरणार, इतक्यांत तो हंस तेथून उड्डून, थोड्या अंतरावर जाऊन बसला. दमयंती पुनः त्या हंसाजवळ गेली व त्याला धरूं लागली, पण तो हंस पुन्हां आणखी थोडा पलीकडे गेला. अशा प्रकारें त्या हंसाने दमयंतीला तिच्या सख्यांपासून बरेंच लांब आणले; आणि नंतर तो तिच्या हातीं सांपडला. हंस हातांत सांपडल्याबरोबर दमयंतीला मोठा आनंद झाला. त्यावेळी इकडे हंसहि मनुष्याप्रमाणे स्मित करूं लागला. तें मनुष्याप्रमाणें हंसाचें हंस पाहून, दमयंती चपापली व ती त्या हंसाला सोडून देऊं लागली. तेव्हां तो हंस ह्मणाला; " दमयंती, तूं अगदीं १ (