पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ स्तबक ४२ वर जाऊन बसला; आणि सभोवतालच्या वनश्रीचे अवलोकन करूं लागला. त्या रम्य अरण्यांतील ती स्वाभाविक असलेली वनश्री पाहून, त्यास मोठी मौज वाटू लागली. व त्या मनोहर वनश्रीच्या दर्शनानें राजाच्या श्रमाचें परिमार्जन होऊं लागलें. राजा या प्रमाणे त्या सृष्टि- सौंदर्याचे अवलोकन करीत असतांना, त्याची नजर एका कांचना प्रमाणें चमकणाऱ्या राजहंसाकडे गेली. तो मनोहर व अभूतपूर्व पक्षी पाहून, नळास अत्यंत आश्रर्य वाटलें; व त्यास तो पक्षी धरण्याची इच्छा उत्पन्न झाली. तेव्हां राजा धनुष्यवाण स्थंडिलावर ठेवून उठला व हळूच पाय न वाजवितां त्या पक्षा- जवळ जाऊन, त्यानें त्या राजहंसास धरलें. राजानें त्या हंसास धरल्याबरोबर हंसानें किंचित स्मित केले व तो मनुष्या प्रमाणें स्पष्टपणे म्हणाला, राजा, मला धरलेंस हें बरें केलें, मी येथें तुझ्या दर्शनाची इच्छा धरूनच आलो आहे. तुझ्या सारख्या पुण्यशील राजाचें दर्शन होऊन, माझ्या या क्षुद्र देहाला तुझे पवित्र हात लागले, हे मी आपले मोठें भाग्य समजतो. राजा, मला आतां तूं मोकळा सोड. मी उडून जाईन अशी तूं मनांत मुळींच कल्पना आणूं नकोस, मी तुला एक आनंदाचें वर्तमान सांगण्यासाठी मुद्दाम आलो आहे. तुझ्या स्कंधावर बसून तुला तें आनंदाचें वर्तमान सांगतो. " तो हंस मनुष्याप्रमाणें अस्खलित भाषण करीत आहे, हे पाहून नळास फारच आश्चर्य वाटलें. मग नळानें त्या हंसाला त्याच्या म्हणण्या प्रमाणें मोकळे सोडून, स्कंधावर बसविलें, नंतर नळराजा त्या हंसाला हाणाला; हे हंसा, तूं कोणाचा तरी दूत आहेस असे मला वाटतें. तुला जे काय सांगावयाचे असेल, तें खुशाल सांग. " नळ - राजानें असें अश्वासन दिल्यावर हंस ह्मणाला; राजा, मी नेहमीं ब्रह्मलोकी आज इकडे येत असतांनां, एक सर्वांग सुंदर व तरूण कुमारिका ती तुला योग्य नोवरी आहे, असे मला वाटल्यावरून मी तुझ्या- कडे मुद्दाम आलो आहे. वैदर्भदेशांत कौंडण्यपूर या नांवांचें एक मोठें नगर असून तेथे भीमक या नांवाचा राजा राज्य करीत आहे. त्या राजाला दमयंती या नांवांची एक अत्यंत सुंदर कन्या आहे. तिच्याच विषयीं मी तुला सांगणार आहे. त्या दमयंतीच्या स्वरूपाचे वर्णन करण्याची शक्ति बृहस्पतीतहि नाहीं, असे मला वाटतें. तिचा वर्ण कांचनाच्या कमळाप्रमाणे मनोहर असून ती पारिजातकाच्या सुमनाप्रमाणें सकुमार आहे. तिचें तें सहास्य वदन ब्रह्मदेवानें सगळी रमणीयता एका ठिकाणी करून घडविलें आहे असे वाटतें. तिचे सतेज डोळे, कमानदार भुंवया, सरळ नासिका, चिंचोळी हनुवटी, प्रफुल्ल गुलाबाच्या सुमनाप्रमाणे दिसणारे कपोल, विशाल कपाळ, भ्रमरासहि लाजविणारा केश- कलाप यांनी ती अत्यंत रमणीय दिसते. ती किती मनोहर आहे हे तिला प्रत्यक्ष पाहिल्यावांचून कळणे अशक्य होय. तसेंच राजा, तिची चालण्याची गति, असतो. पाहिली. कथाकल्पतरू.,