पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] अध्याय ८ वा. अध्याय ८ वा. ४१ १ नळ व दुमयंती यांची कथा. 6 अनिरुद्ध व उपा यांची कथा ऐकल्यावर प्रभावती हंसिणीला म्हणाली; हंसिणी, तूं उपेची कथा माझ्या मनाला समाधान वाटावें म्हणून सांगितलीस खरी; पण ती ऐकून समाधान न वाटतां अधिक काळजी मात्र वाढत चालली आहे. त्या उषेच्या वं माझ्या स्थितींत, जमीनअस्मानाचें अंतर आहे. तिचा एवढा कार्यभाग, तिच्या चित्ररेखा नांवाच्या सखीनें घडवून आणला, ती स्थिति माझी कोठे आहे ? तिला जशी चित्ररेखेची मदत होती तशी मला तर कोणाची देखील नाहीं ! मी तर निःसाह्य व एकटी अशी असून या कारागृहांत बंदिवान् झालेली आहे!! मला कधीं पुरुषाचे दर्शन देखील होत नाहीं !!! मग मदनाचा आणि माझा सहवास घडून येणें तर दुष्करच आहे. " हें प्रभावतीचे निराशा जनक उद्गार ऐकून हंसिणी म्हणाली, " प्रभावती, त्या उपेची जशी चित्ररेखा, तशी मी तुझी दासी आहे. तुझ्यां अमुल्य स्नेहदानानें मी तुझी ऋणी झालेली आहे. तूं सांगशील तें कार्य करण्यास मी तयार असून- मदनाचा आणि तुझा विवाह व्हावा म्हणून, मी शक्य तो प्रयत्न करीन. तुम्हा उभयतांचा सहवास घडवून यावा अशी माझी फार इच्छा आहे. " प्रभावती म्हणाली; हंसिणी, ती चित्ररेखा जशी शक्तिशाली आहे, तशी शक्ति तुला कोठे आहे ? तूं तर बोलून चालून पक्षीण, तुजकडून मला साह्य तें काय होणार ? " मग हंसिणी म्हणाली; प्रभावती, एका हंसानें नळराजाचा व दमयंतीचा विवाह घडवून आणला, हें तुला माहीत नाहीं; असे दिसते. ती कथा जर तुला माहीत होईल तर हंसाचे आंगीं किती सामर्थ्य असतें हैं तुला सहज कळून येईल. " तेव्हां प्रभावती हाणाली; " गडे हंसिणी, मला ती कथा मुळींच माहीत नाहीं. ती ऐकण्याची मला आतां फार उत्कंठा लागली आहे, तर तेवढी कृपा करून सांग." प्रभावतीनें अशी विनंति केल्यावर, हंसिणी प्रभावतीला नळराजाची कथा सांगू लागली. 66 पण 66 68 पूर्वी नैषध नांवाच्या देशांत सूर्य वंशांतील वीरसेन या नांवाचा महान पराक्रमी क्षत्रीय राजा होऊन गेला. त्या वीरसेन राजाचा नळ हा पुत्र होय. नळराजा आपल्या बापाप्रमाणेच पराक्रमी, सत्वशील, पापभीरू व पुण्यशील असा होता. एके दिवशी राजा नळ, अरण्यांत शिकारी साठी गेला असतांनां; शिकार करितां करितां तृषाक्रांत होऊन एका सरोक्सचे। कांठी पाणी पिण्यासाठीं गेला. त्या सरोवरांतील निर्मळा उदक आकंठ प्राशन केल्यावर राजा विश्रांति घेण्यासाठी सरोवराजवळच असलेल्या एका स्फटिक स्थंडिला- .