पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४० कथाकल्पतरू. ३ उपेचें द्वारकेंत आगमन. उषेस याप्रमाणे अनिरुद्ध पति मिळाल्यावर तिला जो आनंद झाला होता, त्याचे वर्णन करणें कठिण होय. हे सर्व उपकार उपेवर चित्ररेखेचे होते. त्याबद्दल उषा चित्ररेखेजवळ वारंवार कृतज्ञता दर्शवीत असे. त्याबद्दल कोणती वस्तु चित्ररेखेस देऊन, तिच्या उपकार - ऋणांतून मुक्त व्हावें हें उप्रेस कळेना; आणि खरोखर ते उपकार तसेच होते. पैसा, संपत्ति, अलंकार, वस्त्र; इतकेंच नव्हे तर सर्व साम्राज्यहि त्या उपकाराच्या मोलास पुरेसे नव्हतें. त्या उपकाराचा मोबदला - अंतःकरणपूर्वक कृतज्ञता दर्शविणे एवढा एकच होता; व त्याप्रमाणें उषा कृतज्ञता दर्शवीतहि असे. लग्नसोहळा पुरा झाल्यावर श्री- कृष्ण, उपेला बरोबर घेऊन, द्वारकेला जाण्यासाठी निघाले, त्यावेळी वियोग- दुःखानें शोणितपुरच्या प्रजाजनांचे डोळे पाण्यानें भरून आले. मग श्रीकृष्णानीं सर्वांचा निरोप घेऊन, त्यांनां आशिर्वाद दिला व ते द्वारकेच्या मार्गाला लागले. इकडे द्वारकेचे प्रजाजन, गोप, गोपी, वगैरे मोठ्या उत्कंठेनें श्रीकृष्णाची वाट पहात होते. भगवान्, अनिरुद्धास उपेसह घेऊन येत आहेत, असें वर्तमान अगोदरच कळल्यामुळे द्वारकेच्या लोकांनां विलक्षण आनंद झाला होता. ज्या दिवशीं श्रीकृष्ण नगरांत प्रवेश करणार होते, त्या दिवशी द्वारकेच्या लोकांनी सर्व शहर उत्तमप्रकारें शृंगारून ठेविलें होतें. राजपथ सडासंमार्जन करून, रंगवल्लिकांनी सुशोभित केला होता. गुड्या, तोरणें, निशाणें, केळीचे खांब यांनीं सर्व घरें आलंकृत केलीं होतीं. स्त्रिया हातीं लिंबलोण घेऊन, अनिरुद्ध व उपा यांची दृष्ट काढण्यासाठी बाहेर येऊन उभ्या राहिल्या होत्या. इतक्यांत श्रीकृष्ण नगराबाहेर आल्याची सुवार्ता लोकांच्या कानावर आली व जिकडेतिकडे मंगल वाद्ये वाजूं लागली. श्रीकृष्णानीं नगरांत प्रवेश केल्यावर प्रजाजनांचे डोळे आनंदाश्रूनीं भरून आले. सर्वांनीं श्रीकृष्णाचा जयजयकार केला. याप्रमाणें वाजत गाजत श्रीकृष्ण भगवंताची स्वारी राजवाड्यांत येऊन पोहोंचली. त्या आनंदमय प्रसंगाचे वर्णन करणें मानवशक्तीच्या बाहेरचें कार्य होय. अनि- रुद्धाची आई रति, हिनें रथांतून उपेस उतरून घेऊन तिची दृष्ट काढिली, व तिला आपल्या हृदयाशीं कुरवाळून धरिलें, उपा व अनिरुद्ध यांस बघून सर्वांची हृदयें आनंदानें गहिवरून आली. तो आनंदोत्सव द्वारकेतील प्रजाजनांनीं कित्येक दिवस चालविला होता. " [ स्तबक