पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] अध्याय ७ वा. सून वेगळे केले. नंतर श्रीकृष्णानें सुदर्शन आवरून धरलें. बाणानें वर मागून घेतल्याप्रमाणे त्याचे सहस्र बाहू खंडण झाल्यावर त्याचा भ्रम दूर झाला. आपणा समोर द्वारकाधीश श्रीकृष्ण भगवान् उभे आहेत असे त्यास दिसलें; त्या बरोबर त्यांच्या चरणावर बाणानें मस्तक ठेऊन, तो ह्मणाला; ' देवा, अशा निमित्यानें तरी तुझें दर्शन झालें. मी या भवबंधनाने फार कष्टलों आहे, तेव्हां या तापत्रयांतून सुटेन असा मला वर दे.' श्रीकृष्ण म्हणाले; 'वाणा, तूं कैलास पर्वतावर जाऊन शंकराची सेवा करून रहा, म्हणजे तुला समाधान प्राप्त होईल.' त्याप्रमाणें बाणासुर लागालाच कैलासी निघून गेला. महादेवाचा तो वरदपुत्र असल्यामुळे महादेवानें त्याचें नांव महाकाळ असे ठेवून त्यास पुढे चिरंजीव केलें. असो, युद्ध आटोपल्या नंतर श्रीकृष्ण, अनिरुद्धास नाग- पाशानें बांधून ज्या कारागृहांत ठेविलें होतें तेथें गेले व अनिरुद्धाचे पाश तोडून टाकून त्यांनी त्यास मोकळे केले. अनिरुद्ध मोकळा झाल्यावरोवर प्रथम बलरामास आनंदानें भेटला, मग त्यानें श्रीकृष्णास आलिंगन दिलें, आणि नंतर तो आपल्या पित्यास भेटला. त्या आनंदमय प्रसंगी सुरवरांनीं यादवांवर आका- शांतून पुष्पवृष्टि केली. कारागृहांतून अनिरुद्धास सोडवून घेतल्यावर श्रीकृष्णानी सर्वांसह शोणितपूर शहरांत मोठ्या आनंदानें प्रवेश केला. त्या वेळी वाणासुराचा प्रधान कुंभक, बरोबर मानकन्यांनां घेऊन श्रीकृष्णास सामोरा आला. त्यानें श्रीकृष्णाच्या पायावर मस्तक ठेऊन भगवंताचे पाय घट्ट धरले; आणि तो ह्मणाला; " देवा, आतां सर्व अपराधाची क्षमा करून नगरवासी जनांचें संरक्षण करावें.” कृष्ण कुंभक प्रधानास अभय देऊन हाणाले; 'कुंभका, तूं माझा परमभक्त आहेस. माझे जे भक्त आहेत, जे माझ्या ठिकाणी लीन आहेत, त्यांनां भिण्याचें मुळींच कारण नाहीं.' या प्रमाणें कुंभकाला श्रीकृष्णाकडून आश्वासन मिळाल्यावर कुंभक भगवंतास हाणाला; 'देवा, आणखी एक विनंति आहे; ज्या उपेसाठी- एवढे युद्ध झालें, त्या उषेचा ब अनिरुद्धाचा विवाहसमारंभ शोणितापुरासच व्हावा, अशी आपल्या सर्व भक्तांची विनंति आहे.' श्रीकृष्णानें तें आपल्या भक्तांचें ह्मणणे कबूल केलें. मग कुंभक प्रधानानें शोणीतपुर उत्तम प्रकारें शृंगारून जिकडे तिकडे गुड्या तोरणें उभारिलीं, आणि सुमुहूर्त पाहून दोघांचा विवाह केला. त्याप्रसंगीं तो लग्नसोहळा पाहण्यासाठी सर्व सुरवर आले होते. चार दिवस शोणितापुरास आनंदाचें साम्राज्य माजलें होतें. कुंभक प्रधानानें बाणासुराचें राज्य, संपत्ति, जड, जवाहिर, वगैरे सर्व अनिरुद्धास आंदण दिलें. परंतु श्रीकृष्णाने त्याचा तितक्यावेळांपुरता स्वीकार करून, तें सर्व राज्य कुंभक प्रधानाचे स्वाधीन केलें, आणि त्याला राज्यावर बसवून त्यास राज्या- भिषेक केला. 6