पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ [ [स्तक विलंब न करितां शोणितापुरास आले. आल्याबरोबर श्रीकृष्णांनी पांचजन्य शंख मोठयानें वाजवून, बाणासुराला युद्धास पाचारण केले. त्याबरोबर बाणहि ससैन्य श्रीकृष्णाबरोबर युद्ध करण्यासाठी रणांगणांवर आला. मग लवकरच उभय पक्षाची भयंकर लढाई जुंपली. त्या तुमुल युद्धांत बाणासुराचे हजारों सैनिक श्रीकृष्णाच्या शस्त्रांकडून भराभर मृत्यु मुखीं पडूं लागले. स्वतःच्या सैन्याचा तो विलक्षण संहार पाहून, वाणासुरास जय मिळण्याची मुळींच चिन्हें दिसेनात. तेव्हां त्यानें शंकराची प्रार्थना करून त्यानां साह्यार्थ बोलाविले. हा शंकरचा वरद पुत्र असल्यामुळे, शंकरास त्यावेळी श्रीकृष्णाचा साहजिक राग आला व लागलीच आपल्या सर्व सैन्यासह श्रीकृष्णाबरोबर युद्ध करण्यासाठी कैलासाहून शंकर शोणितापुराला आले. आतां लवकरच भयंकर लढाई होऊन, सर्व पृथ्वी रक्तमय होईल अशी भीति सर्वांनां वाटू लागली. हें हरिहराचें याण कथाकल्पतरू. . ८८ ८ युद्ध सुरू झाल्यास महा प्रळय ओढवेल असे जाणून अनेक देव दोघांची समजूत करण्यास आले. स्वत: श्रीकृष्ण, महादेवाला म्हणाले, " हे कैलासनाथा, मी बाणासुरास मारण्यास आलों नाहीं, तर त्याचे सहस्र हात तोडून टाकण्यासाठीं आलो आहे. तूंच त्याला असा वर दिला आहेस कीं, यादवाशीं तुझें युद्ध होऊन तुझे सहस्र हात कापले जातील. हे तुझे शब्द खरे करण्यासाठी मो आलों आहे." ब्रह्मदेवानेंहि महादेवास असेंच सांगितलें, ब्रह्मदेव म्हणाला; कैलासपति, तूंच तुझे शब्द असे खोटे करूं लागलास तर कसे चालेल ?’ हें ऐकून शंकराचा राग शांत झाला, व ते सर्व सैन्यासह आल्या मार्गानें कैलासीं निघून गेले. महादेव याप्रमाणें कैलासी निघून गेले तरी, बाणासुराचें धैर्य कमी झाले नाहीं. तो आपल्या सहस्र बाहूंनी प्रत्येक क्षणी कृष्णावर पांचरों बाणांचा वर्षाव करीत होता, परंतु श्रीकृष्ण तितकेहि बाण तोडून टाकीत आणि बाणाच्या सैन्याचा संहार करीत करीत बाणाच्या रथा जवळ आपला रथ नेत होते. बाणासुरहि मोठ्या वेगानें श्रीकृष्णाच्या आंगावर धांवून येत होता. इत क्यांत बाणासुराच्या रथाचा मयूर मोडला, व त्यास दुश्चिन्हें होऊं लागली. तरी तो न डगमगतां पुढें पुढें चाल करीत होता. श्रीकृष्णाच्या बाणानें बाणाच्या रथाचा ध्वज मोडला, सारथी पडला, तरी बाणासुर गत धैर्य झाला नाहीं; हे पाहून, श्रीकृष्णासहि त्याच्या पराक्रमाचें कौतुक वाटले. इतक्यांत बाणाच्या रथाचे घोडेहि पडले, तेव्हां वाण, हातांत गदा घेऊन रथाच्या खालीं उतरला व कृष्णाच्या आंगावर धांवून आला. तेव्हां श्रीकृष्णानें बाणाच्या अंगावर सुदर्शन चक्र सोडलें. त्या चक्राची गति वान्यापेक्षांहि अधिक होती. त्याचें तेज सूर्यापेक्षाहि अधिक असून त्यास सहस्र धारा होत्या. तें चक्र बाणा- मुराच्या भोवती गरगर फिरून बाणासुराच्या बाहूचें खंडण करूं लागले. त्या चक्रानें क्षणार्धीत बाणासुरास फक्त दोन हात ठेवून, बाकी सहस्र हात शरीरापा-