पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] अध्याय ७ वा. चालविला. बाणाच्या सैन्यावर एकदम तुटून पडून, त्यानें हजारों सैनिकांचा संहार अनिरुद्धाचा तो पराक्रम पाहून स्वतः बाणासुरहि त्यांचे कौ तुक करूं लागला. अशा तरुण, सुस्वरूप व पराक्रमी वीरास उपा देणें इंच उचित होय; असें त्यालाहि वाटू लागलें, पण तसे केल्यास आपला सर्वस्वी नाश होईल, या भयानें तो अनिरूद्धाशीं सारखा युद्ध करीत होता. युद्ध कौशल्यांत तो आपली पराकाष्ठा करीत होता तरी, अनिरूद्ध त्याला मुळींच आटोपेना. त्या एकट्या बालवीरानें बाणाचे हजारों सैनिक मारूज़ टाकून, थोड्याच वेळांत रण क्षेत्रावर प्रेतांचे पर्वत तयार करून ठेविले होते. असा तो नरशार्दुळ अनिरुद्ध, मुळींच आटोपत नाहीं असे पाहून, बाणासुर अत्यंत चिंतातूर झाला. शेवटी त्यानें शंकराच्या प्रसादानें मिळालेले सर्पास्त्र, अनिरुद्धाच्या अंगावर सोडलें. त्या बरोबर अनिरूद्धासभांवतीं हजारों प्रचंड सर्प उत्पन्न होऊन, त्यानी अनिरुद्धाचे हात व पाय बांधून टाकले. या प्रमाणे अनिरूद्ध सर्पवद्ध झाल्यावर त्यास कांहींच करितां येईना. अर्थातच त्यावेळी तो रणक्षेत्रावर निःचेष्ट होऊन पडला. अशा नाजूक स्थितीत अनिरूद्ध सांपडलेला पाहून, बाणासुर त्याच्या जवळ वेगानें धांवून गेला व अनिरूद्धाला मारून टाकण्याकरितां त्यानें आपली तलवार वर केली. परंतु इतक्यांत कुंभक प्रधान बाणासुराचा हात धरून ह्मणाला; महाराज, शत्रूस अशा रीतीनें मारणें हा वीराचा धर्म नव्हें. तो · नागपाशानें बद्ध झालेला आहेच, तेव्हां कांही वेळाने मरून जाईल; हैं उघड आहे. मग आपण आपल्या हाताने मारून, उगीच पाप कां जोडून घेतां ? : प्रधानाचें हें भाषण ऐकून बाण राजा आपल्या सर्व सैन्यासह नगरांत परत उपेच्या कानावर ती अशुभ वार्ता गेल्यावर ती त्या दुःखानें वेडी होऊन गेली. ती जमिनीवर गडबडां लोळू लागली, व आपलें मस्तक बडवून घेऊं लागली. त्यावेळी उपेच्या शोकावस्थेला मुळीच सीमा उरली नव्हती. तिची सखी चित्ररेखा, तिला पदोपदी समजावित होती; पण त्या विलक्षण प्रसंगी ती तरी तिला काय सांगून तिची समजूत करणार ? परंतु त्या दोघींच्या मुदैवानें त्या वेळी तेथें नारद मुनी आले, ह्मणून बरें झालें. ते उपेला हाणाले; ' उपे, तूं या संबंधानें मुळींच काळजी करूं नको. तुझा पति कुशल असून त्याची व तुझी लवकरच गांठ पडेल. द्वारकेहून आतां श्रीकृष्ण भगवान् येतील व तुला तुझ्या पतीसह घेऊन जातील. या प्रमाणे नारदानें अश्वासन दिल्यावर उपेला कांहीसे बरे वाटलें. इतक्यांत तिच्या कानावर श्रीकृष्ण भग- वानहि ससैन्य आल्याची बातमी आली. (6 आला. २ बाणासुर वध. बाणासुरानें अनिरूद्धास नागपाशानें बद्ध केले आहे, असें श्रीकृष्णास कळल्या- बरोबर ते बलराम, प्रद्यम्न, वगैरे वीरांना सर्व सैन्यासह घेऊन, क्षणाधीचाहि