पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ स्तबक , (6 युक्तीने सर्व शोध करून, कांहीं वेळानी उपेच्या महालांतील सर्व प्रकार बाणासु- राला निवेदन केला. उपेचें तें विलक्षण चरित्र ऐकून, बाणासुराच्या तळव्याची आग मस्तकाला गेली. त्यानें लागलीच आपल्या दूतांनां बोलावून आणून, त्यांनां उषेच्या महालांत आलेल्या पुरूपाला पकडून आणण्यास सांगितलें. ती राजाज्ञा होण्याबरोबर ते भयंकर दूत एकदम आपापली शस्त्रास्त्रे घेऊन, उपेच्या महालाकडे धांवून गेले. राजदूत आपल्या महालावर चालून येत आहेत हैं पाहून उपा फारच घाबरली, व आतां आपलें पतिनिधान हरपणार असे वाटून, ती शोक करूं लागली. तिची ही स्थिति पाहून अनिरूद्धास मोठें आश्चर्य वाटलें, तो म्हणाला; " उपे, एकाएकीं तूं घाबरून जाऊन अशी रडतेस कां ?” तेव्हां उपा आपल्या पतीला आलींगन देऊन, रुदन करीत म्हणाली, "मी तुमचा सर्वस्वी घात केला. माझ्या बापाला हा सर्व प्रकार कळल्यामुळे त्यानें तुम्हाला पकडून नेण्यासाठी आपले दूत पाठविले आहेत. ते तुम्हाला आतां येऊन पकडून नेतील. तुह्मांवर हा असा प्रसंग येण्यास, सर्वस्वी मीच कारण आहे. मी तुमची स्त्री नसून, तुझाला वैरीण मात्र झाले आहे. " उपा याप्रमाणे विव्हल अंतःकरणानें अनिरुद्धास ती हकीकत सांगत होती. पण अनिरूद्ध ती हकीकत ऐकून निर्भयपणें हंसत होता. तो उपेला ह्मणाला; उपे, एवढया क्षुल्लक कारणावरून तूं एवढी घाबरलीस ! याबद्दल मला फार आश्चर्य वाटतें. तूं मुळींदेखील भिऊं नकोस. मजबरोबर युद्ध करण्यासाठीं तुझ्या वापाचें सर्व सैन्य आर्ले, तरी मी एकटा त्या सर्वांचा संहार करीन. " अनिरूद्ध उपेला याप्रमाणें धैर्य देत आहे, तोंच महालावर बाणासुराचे दूत येऊन दाखल झाले. तेव्हां त्याप्रसंगावधानी अनिरुद्धानें, जवळ कांहीं हत्यार नसल्यामुळे, दाराची अरगळा आपल्या हातांत घेतली, व तो त्या दूतांच्या अंगावर धांवून जाऊन त्यांचा संहार करूं लागला. बाणासुराचे भित्रे दूत अनिरूद्धाचा तो पराक्रम पाहून, प्राण मुठीत धरून राजपथानें पळू लागले. तेव्हां अनिरूद्धहि त्यांच्या मागें अर्गळा घेऊन धांवत गेला व त्यानें क्षणार्धात आपल्या बाहुबलाने हजारों दूतांचा संहार केला. तो प्रकार पाहण्यास शेकडों नगरवासी लोक गोळा झाले होते. अनिरूद्धाचा तो अतुल पराक्रम व सुंदर आकृति पाहून, नगरांतील लोक थक्क होऊन गेले. ते एकमेकांजवळ हाणूं लागले; अहो, या सुंदर व पराक्रमी वीराबरोबर उपेने विवाह केला, यांत अनुचित तें काय केले ? बाणानें तर या दोघांचा विवाह मोठ्या आनंदाने करावयाला पाहिजे.' नंतर लवकरच बाणाच्या कानावर दूतांच्या संहाराची गोष्ट गेली. तेव्हां तर तो अधिक चिडला, व आपला सर्व सैन्यभार सिद्ध करून त्यानें अनिरूद्वावर चाल केली. त्यावेळी अनिरूद्धद्दि आलेल्या सैन्याशी दोन हात करण्यास तयारच होता. मेलेल्या सैनिकांची चांगली चांगली हत्यारें त्यानें आपल्या हातांत धारण केलीं, व ८ कथाकल्पतरू.