पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] अध्याय ७ वा. उपहार करा, आणि मग विश्रांति घ्या." उपेचें हें मंजूळ बोलणे ऐकून, त्याची सर्व भ्रांति दूर झाली. आपणाशीं जी बोलत आहे ती उपाच आहे, अशी त्याची खात्री झाली; पण उषेच्या महालांत आपण एकाएकीं कसें आलों ? तें त्याला मुळींच उमजेना. इतक्यांत त्याची दृष्टि चित्ररेखेकडे गेली. तेव्हां तो चित्ररखेला ह्मणाला. “ चित्ररेखे, तूं रात्रीं उपेसंबंधानें हकीकत सांगितल्यावर, मी येथें कसा आलों, वगैरे प्रकार मला कांहींच कळत नाहीं, तर तेवढा माझा भ्रम दूर कर. मग चित्ररेखा हंसत हंसत हाणाली; अनिरुद्धा, तुला " 19 उपेकडे जावें कीं जाऊं नये, असा विचार उत्पन्न झाल्यावर मी मोहिनी मंत्राने तुला निद्रिस्थ केलें, आणि पलंगासह उचलून, द्वारकेहून या शोणितपुराला आणले. येथून द्वारका अकरा सहस्र योजनें दूर आहे. मला आपल्या सखीसाठी तुला अशा रीतीनें अणावें लागले, याबद्दल क्षमा कर. " चित्ररेखेनें याम- माणे अनिरुद्धाचा भ्रम दूर केल्यावर अनिरुद्ध निश्चित झाला, व तो मोठया आनंदानें उपेच्या महालांत राहिला. त्या दोघीहि कोणाला कळणार नाही अशा रीतीनें अनिरुद्धाचा आदरसत्कार करीत होत्या. सायंकाळी भोजन वगैरे झाल्यावर, मध्यरात्रीचे सुमारास चित्ररेखेनें अनिरुद्धाचें व उपेचें यथाविधि गांधर्वपद्धतीने लग्न लावून दिले. बाई प्रभावती, याप्रमाणें त्या उपेचा व अनिर द्धाचा विवाह झालेला आहे. " ही कथा ऐकून प्रभावती हंसिणीला ह्मणाली; " गडे हंसिणी, बाणासुराच्या सहस्र भुजा कशा तुटून पडल्या तें ऐकण्याची माझी फार इच्छा आहे, तर ती कथा मला सांग. " तेव्हां हंसिणी हाणाली; “ तीहि कथा मी तुला सांगतें. : " अध्याय ७ वा. esse 6000m १ वाणासुर व अनिरुद्ध यांचें युद्ध. हंसिणी म्हणाली, प्रभावती, बाणकन्या उषा, व अनिरुद्ध यांचा विवाह होऊन ते उभयतां दांपत्यसुखाचा अनुभव घेऊं लागले; पण इकडे एके दिवशी राजवाड्यासमोर उभा केलेला ध्वजस्तंभ एकाएकी मोडून खाली जमिनीवर आडवा पडला. तें भयंकर अपशकुनाचें चिन्ह अवलोकन करून, बाणासुर राजाच्या पोटांत चर्र झाले. त्यास असे होण्याचे कारण काय ? ते कळेना इतक्यांत तेथें कांहीं कारणासाठी उपा आली होती, तिच्याकडे राजाची दृष्टि गेली. तेव्हां तिच्या स्थितींत पुष्कळच फरक पडला आहे, असें बाणासुराच्या लक्षांत आलें. मग त्यानें एका हुशार दासीला, उषेच्या महालांत जाऊन - तेथे कोणी पुरुष आहे की काय ते पाहून येण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्या दासीनें