पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ [ स्तबक लक्षांत आले. यानें असा विचार करून रात्र घालविल्यास, तिकडे उपा प्राण त्याग करील, या भयानें अनिरुद्धास चित्ररेखेनें मोहिनी मंत्रानें मोहिनी घातली, व त्यास तशा स्थितीत पलंगासह उचलून शोणितापुरच्या उपेच्या महालांत आणले. उपा चित्ररेखेची अगदी वाट पहात बसली होती. चित्ररेखा अनिरुद्धाला घेऊन आलेली पाहून, उपेस जो आनंद झाला; त्याचें वर्णन करणे कठिण होय. तो चित्ररेखेला कडकडून आलिंगन देऊन ह्मणाली; "गडे, चित्ररेखे, तुझे हे माझ्या वर अनंत उपकार झाले आहेत. या तुझ्या ऋणांतून मीं कधीं देखील मुक्त होणार नाहीं. तूं मला जिवदान दिलेंस तूं मला सौभाग्यवती केलीस. पतिसुखाचा ठेवा मला केवळ तुझ्यामुळे लाधला." हे ऐकून चित्ररेखा ह्मणाली; "उपे, मी यांत कांहीं देखील विशेष केले नाहीं. असें करणें माझें कर्तव्यच आहे. बरें, मी आतां बाहेर बसते. तूं आपल्या पतीच्या पलंगाजवळ बैस. मोहिनी मंत्रा- मुळे तो स्वस्थ निजलेला आहे. त्याची मोहिनी आतां लवकरच दूर होईल. तो जागा झाला ह्मणजे, त्याचा चांगला आदरसत्कार कर." असें मागून चित्र-* रेखा तेथून निघून गेली. नंतर उपा अनिरुद्धाच्या पलंगाजवळ जाऊन उभी राहिली, अनिरुद्धाचें तें मनोहर मुखकमळ पाहून उषा आपले देहभान विसरूं लागली. सूर्याला पाहून कमळणीला जसा आनंद होतो, अथवा चंद्राला पाहून रोहिणीला जसा हर्ष वाटतो, तशी अवस्था त्यावेळी उषेची झाली होती. पलंगाजवळ उभी राहून ती आपल्या पतीला वाळ्याच्या पंख्यानें वारा घा लागली, तेव्हां तो झोंपेंतून जागे व्हावे त्याप्रमाणे देहभानावर आला. डोळे उघडून पाहतो तो, जवळ उषा विनयानें उभी असून चारा घालीत आहे. हा प्रकार बघून, अनिरुद्धास प्रथम आपण झोपेंत असून स्वप्न बघत आहों, अर्से वाटलें; पण हें स्वप्न नसून, हा सर्व प्रकार आपण जागृतावस्थेतच पहात आहोत, अशी त्यानें आपली लागलीच खात्री करून घेतली. प्रत्यक्ष समोर उभ्या असलेल्या उपेला पाहून अनिरुद्धास मोठा हर्ष झाला; पण थोड्या वेळांपूर्वीीं जिला आपण स्वप्नांत पाहिले, ती इतक्या लवकर आपणाजवळ आली कशी ? याचें त्यास मोठें गूढ पडलें. त्यास तो प्रकार कांहींच कळेना. तो साभिनयनानें उपेकडे पहात होता; पण तिजबरोबर बोलण्याचे त्याला धैर्य होईना. इकडे प्रभात काळ होण्याचा समय आला, पहांटेचा गार वारा मुटला, पक्षी मंजूळ स्वरानें गाऊं लागले, तेव्हां अनिरुद्धास आपण कोटें आहोत, आणि कोणत्या स्थितीत आहोत, तें कांहींच उमजेना. त्याचे डोकें या विचारानें त्रस्त झाल्यामुळे तो तोंडावर शेल्याचा पदर घेऊन स्वस्थ पडला, तेव्हां उपेनें तोंडावरील पदर हळूच काढून ती स्मित करून ह्मणाली; 'हे काय, आतां चांगले उजाडलें आहे, आपण प्रातरविधी आटोपा, हे येथे मुखमार्जना- साठी पाणी ठेविलेलें आहे, मंगल स्नानाची तयारी केलेली आहे, स्नान करून ८८ कथाकल्पतरू.