पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] अध्याय ६ वा. ३३ स्वस्थ रहा." चित्ररेखा असें ह्मणून, ज्या पादुकाच्या योगानें आकाशांत त्वरेनें गमन करितां येतें, त्या चिंतामणी पादुका घालून, लागलीच आका- शमार्गानें द्वारकेस आली. सर्व तीर्थे समावृत्त झालेल्या पवित्र द्वारका- नगरीला वंदन करून, ती शहरांत जाऊं लागली; परंतु द्वारकेसभोवती सुदर्शन- चक्र फिरत असल्यामुळे, तिला शहरांत जातां येईना. इतक्यांत नदीतीरी तिची व नारदमुनीची गांठ पडली; तेव्हां तिनें नारदास सर्व वृत्तांत कळवून द्वारकेंत जाण्याचा उपाय विचारला. नारद हा अत्यंत कलहप्रिय होता. भांडण, तंटे, लढाया, हीं पाहून त्याला मोठा आनंद होत असे. भांडणतंट्यावांचून त्याचा एक दिवस देखील सुनका जात नसे. ज्या दिवशी भांडणतंटा होण्याचें कांहींच चिन्ह दिसत नसे, त्या दिवशीं नारद कुत्र्यांनां भाकरी घालून त्यांचे भांडण लावित असे. अनिरुद्ध आणि उपा यांचा विवाह झाल्यास, मोठें रणकंदम माजेल व बरीच गंमत दृष्टीस पडेल; असें जाणून नारदानें चित्ररेखेला, सुदर्शन चक्रावर टाकण्यासाठी एक मंत्र सांगितला. त्या मंत्रामुळे सुदर्शन चक्रापासून श्रीकृष्णांच्या भक्तांनां मुळींच त्रास होत नसे. चित्ररेखेनें सुदर्शन चक्रावर तो मंत्र टाकून द्वारकेंत प्रवेश केला, व लागलीच ती अनिरुद्ध निजला होता त्या महालांत आली. ३ उपा- अनिरुद्ध भेट. - इकडे अनिरुद्धाची अवस्थाहि उपेप्रमाणेंच झाली होती. त्यालाहि त्याचरात्री स्वप्न पडून, स्वप्नांत उपा दृष्टीस पडली होती. चित्ररेखा त्याच्या महालांत गेली त्यावेळीं, तो आपल्या पलंगावर कामशरानें विव्हल झाल्याप्रमाणे दिसत होता. त्याने आपल्या तांबूल पात्रांतून विडा घेतला तो कानावर ठेवला, आणि फुलें ऊन ती तोंडांत घालूं लागला. इतक्यांत त्याची दृष्टि चित्ररेखेकडे गेली, वा तिला पाहून तो कांहींसा भानावर आला; पण त्या अनोळखी स्त्रीला आपणाकडे एकदम आलेली पाहून, त्याला थोडी भीतिहि वाटली. तो तिला हाणाला; "वाई, तूं कोण आहेस ? आणि एकाएकी येथे कशासाठी आली आहेस ?" चित्ररेखा म्हणाली; “अनिरुद्धा, मी उपेची सखी आहे, तिनें आज तुला स्वप्नांत पाहिल्या- पासून तिची अवस्था अगदी वेड्यासारखी झाली आहे. तूं जर लवकर आला नाहींस तर कदाचित ती प्राणत्याग देखील करील. तेव्हां एक पळहि फुकट न घालवितां तूं आतांच्या आतां माझ्याबरोबर चल." अनिरुद्धास यावेळी काय करावें तें कळेना. उपेकडे एकदम जावें असे त्यास वाटें, परंतु चित्ररेखेच्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसेना. न जाणो, ही कदाचित कोणी भलतीच स्त्री असेल आणि माझा नाश करण्याच्या हेतूने मला फसवित असेल. तसेच आपण आपला बाप व आजा यांनां विचारल्यावांचून कसें जावें ? असाहि त्यास विचार पडला. अनिरुद्ध अशाप्रकारें विचार करीत आहे, हे चित्ररेखेच्या तेव्हांच