पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ कथाकल्पतरू [ स्तवक जशी आकृति असेल तशी ती बरोबर कढावयाची, या कलेत चित्र- रेखा अत्यंत निष्णात होती, या तिच्या गुणावरूनच तिला चित्ररेखा असें नांव मिळालें होतें. प्रथम तिनें स्वर्ग लोकांतील इंद्र, वरुण, गंधर्व, वगैरे अनेकांची चित्रे काढून उपेस दाखविलीं. ती चित्रे पाहून उपा म्हणाली; 'यांत मी पाहिलेला पुरुष मुळींच नाहीं.' मग चित्ररेखेने भूतलावरील सर्वोचीं चित्रे लिहिलीं. तीं पाहूनहि उषा निराश झाली, मग पाताळांतील सर्वांची चित्रे तिनें काढली ती पाहून उपा पूर्ण निराश झाली. ती म्हणाली; 'चित्ररेखे, यांत माझा पुरुष दिसत नाही. सखे, आतां त्याचा शोध लागण्याचा मुळींच संभव दिसत नाही. त्या पुरुषाची मी स्वप्नांत का होईना; पण अर्धीगी झालेली आहे. ज्या स्त्रीच्या हातून पतिसेवा घडत नाहीं, ती महापापी होय असे शास्त्र आहे, तेव्हां मजसारख्या पापी स्त्रीनें जिवंत राहण्यापेक्षां मरणेच चांगलें. तो पुरुष प्राप्त होण्याची कांहींच आशा नसेल तर मी आपला प्राणत्याग करीन.' चित्ररेखा उपेच्या डोळ्यांतील अश्रु पुसून म्हणाली; 'बाई उपे, अझून निराश होऊं नकोस, श्रीकृष्णाच्या द्वारका नगरीतील पुरुषांची चित्रे काढावयाची राहिली आहेत, त्यांत तुझा पति खात्रीनें असेल, असे म्हणून चित्ररेखेनें प्रथम श्रीकृष्णाचें चित्र काढल, तें पाहून उपा म्हणाली; 'गडे चित्ररेखे, माझ्या पतीचा चेहरा श्रीकृष्णासारखाच आहे असे मला वाटतें. अंग आकृति अशीच आहे, पण वर्ण गौर आहे. ' नंतर चित्ररेखेनें श्रीकृष्णाचा वडील मुलगा मदन, याचे चित्र काढले. ते पाहून उपेला हाच आपला पति असावा असा संशय पडला; पण ते चित्र नीट न्याहाळून पाहून ती म्हणाली; 'चित्ररेखे, याच्याचसारखा आहे, पण हा नाहीं. अंग, रंग, आकृति वगैरे याच्याचप्रमाणे आहे, पण हा जरा प्रौढ आहे, आणि माझा पति अगदी तरुण आहे.' हे ऐकून चित्ररेखा हंसत ह्मणालीः 'सखे उपे, तूं फार भाग्यवान आहेस. यादवांच्या वंशातील पुरुष तुला पति मिळाला आहे. प्रत्यक्ष द्वारकाधीश भगवंत श्रीकृष्ण यांच्या नातवाशीं तुझा विवाह होणार असे दिसतें.' असें ह्मणून चित्ररेखेनें मदनाचा मुलगा अनुरुद्ध, याचें चित्र काढले. तें पाहून उपा एकदम ह्याणाली; 'गडे, हाचगे हाच.' असें ह्मणून उपेनें चित्ररे- खेच्या हातांतून ते चित्र आपल्या हातांत घेतले व तें वंदन करून त्याचें तिनें प्रेमानें चुंचन घेतले. नंतर उपा ह्मणाली; 'गडे चित्ररेखे, मृगजळाने जशी तृषा शांत होत नाहीं, तसे या चित्रानें माझें काय समाधान होणार आहे बरें ? तर सखे, या अनुरुद्धाची व माझी भेट होईल अशी कांहीं व्यवस्था कर, आणि तसे होण्यासारखे नसल्यास मला स्पष्ट सांग, ह्मणजे मी आपला प्राणत्याग करून मोकळी होते.' चित्ररेखा उपेस अश्वासून ह्मणाली; 'उपे, आतां तूं मुळीं देखील काळजी करूं नको, मी आतां द्वारकेंत जाते, आणि सूर्योदय झाला नाहीं तो अनुरुद्धास तुझ्याकडे घेऊन येते. तोपर्यंत तूं सावधपणे ●