पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] ३१ आपला निजावयाचा पलंग उत्तम शृंगारून त्यावर जाऊन ती निजली. उपेला कोणतें स्वप्न पडतें, व स्वप्नांत तिची काय अवस्था होते; हे पाहण्यासाठी तिची सखी चित्ररेखा, रात्रभर त्या पलंगाजवळ बसून होती. रात्रींचा प्रथम प्रहर संपल्यावर दुसऱ्या प्रहरांत उपेला स्वप्न पडण्यास आरंभ झाला. उपा पलंगावर पाय लांब करून निजली होती, परंतु स्वप्नांत दिसणारा पुरुष तिच्या मंचकाजवळ आल्याबरोबर, उपेनें आपले पाय वर सरकवून घेतले, त्यावरून स्वप्नांत दिसणाऱ्या पुरुषाला उषेनें पलंगावर बसवून घेतलें असें चित्ररेखेनें ओळखले. त्यावेळी उषेचा चेहरा सस्मित दिसूं लागला. त्यावरून ती त्या पुरुषाबरोबर हंसत आहे, असे चित्ररेखेनें जाणलें. नंतर एखाद्या पुरुषास आलिंगन द्यावें त्याप्रमाणें उषेनें आपले बाहू केले, आणि झोपेंत तिनें आपले थोडे तोंड फिरविलें. त्यावरून तिनें आपला गाल चुंबनासाठी स्वप्नांतील पुरुषा पुढे केला असें चित्ररेखेच्या लक्षांत आले. याप्रमाणे चित्ररेखा उपेची ती झोपे- तील रम्यलीला पहात असतां उषेचा चेहरा एकाएकी भयाकूल झालेला दिसला, इतक्यांत उपाहि जागी होऊन, घाबरलेल्या अवाजानें म्हणाली; "माझे पति आतां पलंगावर बसलेले होते, आणि इतक्यांत कोठें गेले ?" असें म्हणून उपा वेड्याप्रमाणे इकडे तिकडे पाहूं लागली. ती तिची स्थिति पाहून चित्ररेखा म्हाणाली; 'वेडे, स्वप्नांत पाहिलेला पुरुष तूं येथें शोधलास तर कसा मिळणार ! उषा म्हणाली; ‘चित्ररेखे, स्वप्नांत पाहिलेल्या पुरुषाची विरहबाधा मला क्षणभर देखील सहन होत नाहीं, त्याची व माझी भेट वकर होईल, अशी कांहीं तरी व्यवस्था कर. चित्ररेखा म्हणाली; 'उषे तूं त्यासंबंधानें मुळीं देखील काळजी करूं नको, तूं त्या पुरुषाचें नांव व गांव सांग, म्हणजे मी त्यास आतां विमानांत बसवून घेऊन येतें.’ चित्ररेखेचं हें बोलणे ऐकून उषा गोंधळून गेली, ती म्हणाली; 'चित्ररेखे, मी त्या पुरुषाचें नांव व गांव मुळींच विचारलें नाहीं. तेव्हा चित्ररेखा म्हणाली; 'जर त्याचें नांव व गांव माहीत नाहीं, तर मी तरी त्याला कशी शोधून आणणार ? ' हें ऐकून उपेस फार वाईट वाटू लागलें, ती डोळ्यांतून अभ्रू गाळू लागली, आणि त्या विरहव्यथेमुळे वेड्यासारखें करूं लागली. तिची सखी चित्ररेखा फार कुशल होती, पण त्या पुरुषाचें नांव माहित नसल्यामुळे तिचाहि निरुपाय झाला होता, अशा स्थितीत आपल्या सखीची समजूत कशी करावी हे तिला मुळींच कळेना. इकडे उषा तर स्वप्नांतील पुरुषासाठीं अगदी च्याकूळ झाली होती. मग चित्ररेखेनें अशी युक्ति योजिली की अनेक देशाच्या राजांची चित्रे उपेस दाखवावीत, म्हणजे त्यांत तिचा पति असल्यास ती ओळ- ग्वील. आणि अशा रीतीनें त्या पुरुषाची ओळख झाल्यावर आपण त्यास घेऊन येऊं. चित्ररेखेनें उषेला त्याप्रमाणे सांगून तिला आपल्या जवळ बसविलें, व आपण रंग वगैरे साहित्य घेऊन चित्रे काढूं लागली. अध्याय ६ वा.