पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० कथाकल्पतरू [ स्तबक करील, त्याच्याबरोबर तुझें युद्ध होऊन त्यांत तुझे सहसहि हात तुटतील. याप्रमाणे वरप्रदान देऊन शंकर स्वस्थानीं निघून गेले. बाणासुरासहि भलतंच मागणे मागितल्याबद्दल पश्चात्ताप होऊं लागला, पण मागाहून पश्चात्ताप होऊन तरी काय उपयोग ! बाणासुरानें झालेली सर्व हकीकत आपला प्रधान जो कुंभक त्यास सांगितली. प्रधानास राजाच्या त्या वेडेपणाबद्दल फार खेद झाला. इकडे राजकन्या उषा उपवर झाली होती, विवाह करावा तर तिचा पति तोच आपला शत्रु होणार, अशा विचारांत राजा असतां प्रधानानें राजाला अशी सल्ला दिली कीं, राजकन्येचा विवाह न करितां तिला आजन्म अविवाहित ठेवावी ह्मणजे झाले. राजाने ती गोष्ट निरुपाय ह्मणून कबूल केली. कदाचित् राजकन्या स्वत:च कोणाबरोबर विवाह करील ह्मणून राजानें तिला एका महालांत ठेवून त्या महालांत पुरुषांचा मुळींच प्रवेश होणार नाहीं, अशी व्यवस्था करून ठेविली. उपेला फक्त कैलासपर्वतावर शंकराची पूजा करण्यासाठी जाण्याची परवानगी होती, त्यावांचून अन्य कोणत्याहि कारणासाठी उपेला आपल्या महालाच्या बाहेर पडतां येत नसे. तिची सखी चित्ररेखा या नांवाची होती, ती उपेला रोज प्रदोषकाळी विमानांत बसवून शंकराच्या पूजेसाठी कैलासी नेत असे. २ उषा स्वप्न. एके दिवशीं रोजच्या नियमाप्रमाणे उपा विमानांत बसून कैलासपर्व- तावर शंकराच्या पूजेसाठी गेली होती, त्यावेळीं शंकर पार्वतीसह सारीपाट खेळत बसले होते; तें पार्वतीचें पतिसुख पाहून उषेला स्वतःच्या दुःस्थितीबद्दल फार खेद वाटू लागला. आणि मनांत म्हणाली, 'हे देवी पार्वती, या तुझ्या मुलीला या अशा तारुण्यावस्थेत हें पतिसुख नाहीं हें तुझ्या कसे लक्षांत येत नाहीं ?' पार्वतीनें उपेच्या अंतःकरणाची ती तळमळ लाग- लीच ओळखिली. व तिला अश्वासन देऊन म्हणाली; 'तूंहि लवकरच पति सुखाचा अनुभव घेशील. येत्या वैशाखशुद्ध द्वादशीच्या दिवशी तुला एक • स्वप्न पडेल, त्या स्वप्नांत तूं जो पुरुष पाहशील, त्या पुरुषाबरोबरच तुझा विवाह होईल. उमादेवीनें उपेला याप्रमाणें अश्वासन दिल्यावर तिला फार आनंद झाला व ती शंकराची पूजा करून चित्ररेखेसह आपल्या मंदिरांत परत आली. त्या दिवसांपासून उपेला द्वादशीचा ध्यास लागला होता. ती आपल्या सखीला वारंवार द्वादशी कधी येईल म्हणून विचारीत असे. द्वादशी पर्यंतचे दिवस उपेला युगाप्रमाणे वाटत होते. एकेक दिवस ती मोठ्या कष्टानें कंठित होती, शेवटीं तो द्वादशीचा दिवस एकदांचा उगवला. त्या दिवशी उपेला स्वप्नांत कोणता पुरुष दिसणार, याची मोठी हुरहुर लागली होती. त्या दिवशीं तिनें मंगलस्नान केलें, उत्तम प्रकारचे वस्त्र परिधान केलें, आणि 7