पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] अध्याय ६ वा. २९ श्रीकृष्णाचा जन्म असल्यामुळे त्यास छत्रसिंहासनाचा लाभ घेता येत नाहीं.. ‘ उग्रसेनास राज्यावर बसवून आपण सर्व व्यवस्था पहात आहे." ही कथा सांगून हंसिणी प्रभावतीला म्हणाली; "प्रभावती, आतां तुला असे वाटत असेल की, मी असुराची मुलगी असल्यामुळे मदन माझा स्वीकार करणार नाहीं, तर ती तुझी शंका व्यर्थ आहे. कारण, मदनाचा मुलगा अनिरुद्ध यानें बाणासुराची मुलगी उपा, हिजबरोबर विवाह केलेला आहे." हे ऐकून प्रभावती म्हणाली; “वाई हंसिणी, त्या उपेची गोष्ट मला ऐकण्याची फार उत्कंठा आहे, तर तेवढी कृपा करून सांग.” प्रभावतीची ती इच्छा पाहून हंसिणी तिला उपेची कथा सांगू लागली. अध्याय ६ वा. ●0961000mm उषा व अनुरुद्ध यांच्या विवाहाची कथा. हंसिणी म्हणाली; "प्रभावती, वाणासूर म्हणून जो प्रसिद्ध राजा होऊन गेला त्याची उपा ही कन्या होय. ईश्वराचा परमभक्त प्रहाद, या प्रहादाचा पुत्र विरोचन, विरोचनाचा पुत्र बली, आणि बलीचा पुत्र बाणासूर हा होय. तो महा शिवभक्त होता. पाताळांत जाऊन तो प्रत्यहीं एक हजार कमळे आणीत असे, व त्या कमळांनी महादेवाची पूजा करीत असे. याप्रमाणे शंभर वर्षे महादेवाची सेवा केल्यावर त्यास महादेव प्रसन्न झाले व तुझी इच्छा पुरी करितों म्हणून म्हणाले. बाणाने त्यावेळी महादेवाजवळ आपणास एक सहस्र हात असावे व पुत्राप्रमाणें अधिकार असावे, असा वर मागून घेतला. बाणासुराची राजधानी शोणितापूर ही होय. वाणासुराप्रमाणे त्याची मुलगी उपा हो शिवाचीच भक्ति करीत असे. बाणानें याप्रमाणे वरप्रदान मिळ- विलें होतें, तरी त्याचा शिवपूजा करण्याचा क्रम सारखा चालला होता, तेव्हां शंकर त्यास कांही दिवसांनी पुन्हां प्रसन्न झाले; शंकर प्रसन्न झाल्यावर बाणासुर शंकराला ह्मणाला; 'देवा, लवकरच एखादा युद्धप्रसंग येऊन त्यांत माझ्या या सहस्रभुजा तुटून पडाव्यात अशी माझी इच्छा आहे.' हे चमत्कारिक मागणें ऐकून शंकरास फार खेद वाटला. शंकर ह्मणाले; 'बाणासुरा, तूं हें कांहीं तरी भलतेंच मागितलेंस. अरे मागणें तरी मागतां आले पाहिजे, कामधेनु आली असतांना भिक्षा मागण्याची इच्छा व्हावी, पवित्र गंगा नदी सन्निध असतां तहान भागविण्यासाठी डबक्याकडे लक्ष जावें, त्याप्रमाणेंच तुझें हैं मागणे होय. असो, आतां तूं ज्या अर्थी मागितलें आहेस त्या अर्थी आह्मास तुझी इच्छा पुरी करणे भाग आहे. तुझी मुलगी उषा, इच्याबरोबर जो विवाह