पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ स्तबक २८ 6 आली, ते म्हणाले; चरणांवर मस्तक ठेवून उःशाप मागू लागला. तेव्हां शुक्राचार्यास त्याची दया जर तुझा एखादा मुलगा तुझी ही जरा घेईल तर तो वृद्ध होईल व तूं तरुण होशील.' राजास याप्रमाणे उःशाप मिळाल्या- वर त्याला थोडेंसें समाधान वाटू लागले. परंतु जरा एखाद्या मुलाला द्यावयाची हा तरी त्याला मोठी काळजीच होती. राजास तर ती जरावस्था क्षणभरहि सहन होईनाशी झाली. त्याचे काळेभोर कैंस पांढरे स्वच्छ झाले. अंग थरथर कांपूं लागलें, डोळ्यांस चिपडें येऊन त्यांतून पाणी गळू लागले, कानानें ऐवृं येईनासे झालें, दांत पडून जाऊन तोंडाचं बोळकें झालें, आणि मुखांतून लाळ गळू लागली. पाठ वांकून कमान झाली, काठीवांचून चालतां येईनासें झालें, मुलें चेष्ठा करूं लागली, त्याच्या खोंकण्याच्या त्रासाने बायका त्यास घराच्या बाहेर जाऊन खोका म्हणून सांगू लागल्या. त्या जरावस्थेत राजाला शारीरिक व मानसिक असे दोन्ही कष्ट होऊ लागले. शेवटी राजा त्या ज़रावस्थेमुळे फारच त्रासला व यदु नांवाच्या मुलाजवळ येऊन त्याला म्हणाला; "यदु, माझी ही जरा तूं घे, आणि तुझें तारुण्य मला दे." बापाचें हे बोलणे ऐकून यदूला फार हंसूं आलें, तो म्हणाला; "बाबा, ही गोष्ट कशी होईल ? रत्न देऊन स्फटिक कोणीतरी घेईल कां ?" यदूचें हें बोलणे ऐकुन राजा निराश झाला व तुर्वसुकडे जाऊन त्यास आपली जरा घे, म्हणून म्हणूं लागला. तें ऐकून तुर्वसु म्हणाला; 'असे कसें होईल ? जिवंतपण सोडून मरण कोण पत्करील ? कापूस घेऊन कोणी पितांबर देईल काय ? बाबा, आपण तर विष देऊन अमृत मागत आहां.' याप्रमाणे देवयानीच्या मुलांनी सांगि- तल्यावर राजा शर्मिष्ठेच्या मुलांकडे गेला, व दुर्जयाला म्हणाला, दुर्जया, ‘माझी ही जरा घेऊन तूं आपलें तारुण्य मला दे.' दुर्जय म्हणाला, 'बाबा, असे मजकडून होणार नाहीं. मी आपला सुंदरपणा तुम्हाला देऊन तुमचा विद्रूपपणा मी घेऊं ! इतका मी वेडा नाहीं.' नंतर ययाति राजा कुरुकडे गेला व त्यास आपली जरा घेण्यास सांगू लागला. कुरु म्हणाला; 'यांत काय मोठेसे आहे; बापासाठी मुलानें प्राण देण्यासहि तयार असले पाहिजे, मग आपण तर फक्त तारुण्यच मागत आहां. मी आपले तारुण्य तुम्हाला देऊन तुमची जरा घेण्यास मोठ्या आनंदाने तयार आहे.' मग ययाति राजानें आपली जरा कुरूला देऊन, कुरूचें तारुण्य आपण घेतले. त्या तारुण्याचा उपभोग एक सहस्र वर्षे घेतल्यानंतर राजानें आपले तारुण्य पुन्हां कुरूस परत दिलें, व जरा आपण घेतली. कुरूच्या या पितृभक्तिमुळे राजानें राज्य कुरूला दिले, व यदु वगैरे तिघां मुलांना शाप देऊन म्हणाला; 'तुम्हा तिघांच्या वंशांत कोणालाहि सिंहासनाचा व छत्रचामरांचा उपभोग घडणार नाहीं.' असे म्हणून ययाति राजा कुरूस राज्य देऊन आपण तपासाठी अरण्यांत निघून गेला. या ययातीकडून शाप पावलेल्या यदुवंशांत कथाकल्पतरू.