पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] अध्याय ५ वा. आला. त्या दिवशीं राजा रानांत शिकारीसाठी गेला होता. शिकार मिळवि ण्यासाठी राजास फार श्रम झाले होते. त्या श्रमानें थकलेला राजा नगरांत येत असतांना शर्मिष्ठा त्याच्या दृष्टीस पडली. शर्मिष्ठा च्या वेळी ऋतुस्नात असल्यामुळे फारच मनोहर दिसत होती; तिला पाहिल्यावर राजाला अनि बार कामलालसा उत्पन्न झाली व तो तसाच शर्मिष्ठेच्या मंदिरांत गेला.. शर्मिस राजा आपल्या मंदिरांत आल्याबद्दल फार आनंद झाला, व तिनें राजास प्रेमालिंन देऊन राजाची इच्छा पूर्ण केली. या गोष्टीस कांही दिवस गेल्यावर सर्मिठेसहि दोन पुत्र झाले. वडील मुलाचें नांव दुर्जय व धाकट्या मुलाचें नांव कुरू असें ठेविलें होतें. ही मुले साधारण मोटीं झाल्यावर साहाजिक खेळण्यासाठी घराबाहेर पडूं लागली. मुले याप्रमाणे घरा- पुढे एके दिवशीं खेळत असतांना रस्त्यानें कांहीं कारणासाठी देवयानी जात होती, तिच्या दृष्टीस ती मुलें पडलीं. ती सर्वांगसुंदर मुलें पाहून देवयानीस मोटें आश्चर्य वाटलें. ती लामलीच शर्मिष्ठेच्या मंदिरांत गेली व त्या मुलांना आपल्या बरोबर घेऊन राजवाड्यांत आली. मुलांच्या चेहऱ्यावरून व एकंदर आकृतीवरून हों मुलें शर्मिष्ठेस ययातिपासूनच झालेली आहेत, असे तिला वाटले. इतक्यांत ययाति राजाहि देवयानीच्या मंदिरांत आला. राजा को- गास न कळत शर्मिष्ठेच्या मंदिरांत वारंवार जात असल्यामुळे तिच्या मुलांचा व त्याचा साहजिक परिचय झाला होता व तो त्याचीच मुले असल्या- मुळे त्या मुलांवर त्याचें प्रेमहि बसले होतें. राजा देवयानीकडे आल्या- चरोबर शर्मिष्ठेचीं मुलें हर्षानें ओरडून राजाजवळ गेली. राजास त्यावेळी प्रेमभ रामुळें भान न राहून त्यानें त्या दोन्ही मुलांना उचलून घेऊन त्यांचें चुंबन घेतले. हे पाहून देवयानीस अनावर संताप उत्पन्न झाला. देवयानी राजाला म्हणाली, " ती शर्मिष्ठा माझी वैरीण असून तिला तुम्ही पुत्र दिलेत ही गोष्ट अत्यंत अनुचित केलीत. ती माझी दासी व बटिक असून तिचें चोज तुम्ही पुर विलेंत हैं मी आतांच माझ्या पित्याला जाऊन कळवितें. मी आतां आपल्या मुलां- सह येथें क्षणभर देखील राहाणार नाहीं." देवयानीचें हें रागाचें भाषण ऐकून ययाति राजास फार भीति वाटू लागली. देवयानीचा बाप शुक्राचार्य, यांनी शाप दिल्यास आपली दुरवस्था होईल, म्हणून तो देवयानीची क्षमा मागून राग न करण्याबद्दल तिची वारंवार विनंति करूं लागला, परंतु देवयानीचा राम शांत झाला नाहीं. तिनें लागलेंच आपल्या बापाला बोलावून आणले व त्यास झालेली सर्व हकीकत कळविली, ती ऐकून शुक्राचार्योसहि फार राग आला. शुक्राचार्य रागावून म्हणाले, "राजा ययाति, तूं फार लंपट बुद्धीचा आहेस. म्हणून तुला आतांच जरा प्राप्त होईल." असा शाप मिळाल्याबरोबर ययाति राजा एकदम अत्यंत म्हातारा दिसूं आगला. ययाति राजा त्यावेळीं शुक्राचार्याच्या