पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ था. ] . अध्याय ६ वा. त्यांनां येथें घेऊन येण्यास तयार आहे, परंतु धन्याचें हिताहित पाहणें हें सेवकाचें कर्तव्य असल्यामुळे मी आपणात माझा अभिप्राय कळविला आहे. आपण कृष्णाच्या नाशाची तयारी जशी करावयाला पाहिजे होती तशी केली आहे, हे खरें, पण आपण आजपर्यंत जे रथीमहारथी वीर कृष्णाच्या नाशासाठी पाठविले होते, त्या सर्वांचा विध्वंस कृष्णानें आपल्या बाहुबलाने सहज करून टाकिला. हे लक्षांत आणिलें ह्मणजे त्या कृष्णाची शक्ति, त्याचें विल- क्षण सामर्थ्य व अभूतपूर्व युद्धनैपुण्य याबद्दल कोणासहि संशय राहणार. नाहीं; तेव्हां आपल्या या तयारीचा कांहींहि उपयोग होणार नाही. याउपर आपली मर्जी, मी आपला हुकूम मानण्यास तयार आहे. " अक्रूराचें तें भाषण ऐकून कंसाला कांहीं विशेष वाटले नाहीं. तो अक्रूराला हाणाला; अक्रूरा ! तुझें ह्मणणें कदाचित् खरेंहि असेल, तथापि मी प्रयत्नवादी आहे. प्रयत्न करीत असतांना त्यांत मला अपयश आलें तरी हरकत नाहीं. जे वीर आहेत ते सोक्ष किंवा मोक्ष यावांचून तिसरा मार्ग शोधीत नाहींत. तर तूं गोकुळांत जा व कृष्ण आणि बलराम यानां घेऊन ये.” 46 ५. अक्रूराचें गोकुळांत आगमन. कंसानें याप्रमाणें निकराने सांगितल्यावर अक्रूराचा नाइलाज होऊन तो निमूटपणें स्वामिकार्याला उद्युक्त झाला; पण त्या वेळी त्याच्या मनाची स्थिति मोटी चमत्कारिक झाली. तो जरी कंसाचा ताबेदार होता, तरी श्रीकृष्णाचा भक्त होता. अशा नीच कार्यासाठी श्रीकृष्णाला निमंत्रण करण्याचा प्रसंग आपणावर आला याबद्दल त्याला मरणप्राय दुःख होऊं लागले. त्या वेळी कोणता मार्ग स्वीकारावा हैं त्याला कळेना. शेवटीं तो आपल्या स्त्रियेकडे गेला व तिला त्यासंबंधाने विचारूं लागला. तेव्हां ती ह्मणाली; " श्रीकृष्ण भग- वंताला सर्व हकीकत कळवून निमंत्रण करावें हें वरें" परंतु तसे केल्यास स्वामि- द्रोह केल्यासारखें होईल अशी अक्रूराला भीति वाटू लागली; तेव्हां त्याची स्त्री हंसून हाणाली; " अहो तो जगदीश्वर सर्व कांही जाणतो आहे. तुझी व मी याप्रमाणे येथे बोलत आहों तें देखील सूक्ष्मदृष्टीनें श्रीकृष्ण भगवान् पहात आहे; मग कंसाचा तो नीच मनोदय भगवंतास कळला नसेल काय ? स्वामी- कार्यास अनुसरून वागणे, व सजनांचा सांभाळ करणें हें मानवी प्राण्याचें मुख्य कर्तव्य आहे. त्यास अनुसरून खरी हकीकत कृष्णास कळविणें हेंच उक्त होय. " अक्रूराच्या स्त्रीनें दिलेली ही सल्ला अक्रूराला पसंत पडली व तो आपला रथ सज्ज करून मथुरेहून गोकुळास जाण्यासाठी निघाला. आज आपणास श्रीकृष्ण भगवंताचें दर्शन होणार या विचारानें अक्रूराला अत्यानंद झाला होता; त्या विचारामुळे अक्रूराला तें कार्य आनंदप्रद वाटू लागलें आणि श्रीकृष्णाचे दर्शनानें आपल्या देहाचें सार्थक होणार, असा त्यासं .