पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ स्तबक भरंवसा उत्पन्न झाला. तो रथांत बसून चालला असतां वाटेत त्याला शकुनहि चांगले होऊं लागले. कृष्णाची भेट झाल्यावर त्याच्या चरणीं अशा रीतीनें मस्तक ठेवीन, त्याला अशा रीतीनें आलिंगन देईन, त्याची अशी पूजा करीन, वगैरे विचार सगळ्या रस्त्यानें त्याच्या मनांत चालले होते. कृष्णाच्या भेटीला उत्सुक झालेल्या अक्रूरानें आपला रथ वास्तविक मोठ्या वेगाने चालवावयाला पाहिजे होता, परंतु त्याचें अंतःकरण कृष्णमय झालें असल्यानें रथ हाकण्याकडे त्याचें लक्षच नव्हते. केव्हां केव्हां तर तो कृष्ण- • चिंतनांत ध्यानस्थ होऊन स्वस्थ बसे; तेव्हां त्याचे घोडेहि खुशाल स्वस्थ उमे रहात. जणूं काय अक्रूराचे ध्यानाचा भंग होऊं नये अशी तेही काळजी घेत होते. अशा प्रकारें मार्ग आक्रमीत सायंकाळच्या वेळी अक्रूर गोकुळांत येऊन पोहोंचला. या वेळीं गोपी व गोपाळ रानांतून परत आल्याची पावलें रस्त्यावर उमटली होती. ती पाहून अक्रूरास अत्यंत आनंद झाला व तो रथाखालीं उतरून श्रीकृष्णाची पावलें ज्या भूमीवर उमटली होती, त्या भूमीवर गडबडां लोळू लागला; श्रीकृष्णाच्या नुसत्या चरणधूलीनेंच आपण पवित्र झालों असें त्याला वाटू लागले. अशा प्रकारें कृष्णमय झालेला अक्रूर नंदाच्या वाड्यांत येऊन पोहोचला. अक्रूर आल्याचें ऐकून नंदाचे घरांतील सर्व माणसांनां मोठा आनंद झाला. नंदानें त्याचा मोठा सत्कार करून त्याचें कुशल विचा- रिलें. आपला एवढा आदरसत्कार केल्याबद्दल अक्रूरानें नंदाजवळ कृतज्ञता व्यक्त केली व कृष्णाच्या भेटीची इच्छा दर्शविली. त्या वेळी कृष्ण गायींचें दूध काढीत होता, तेथें नंदाचा एक दूत अक्रूराला घेऊन गेला. तेथें जातांच अक्रूरास भगवंताची चतुर्भुज मूर्ति शंखचक्रगदापद्म यांनी युक्त अशी दिसली. महायोग्यांसही दुर्मिळ अशी ती प्रभूची मूर्ति पाहून अक्रूराचे नेत्र प्रेमाश्रूंनीं भरून आले; त्याचें अंतः :करण सद्गदित झाले व त्यानें श्रीकृष्णाचे चरणावर • मस्तक ठेवून त्याचे पाय घट्ट धरले. १७० कथाकल्पतरु. आज आपल्या आपला प्रेमळ भक्त भेटल्यानें भगवान् श्रीकृष्णालाही प्रेमाचें भरतें आलें. त्यांनीं अक्रूराच्या मस्तकावर हात ठेवून त्याला वर उठविलें व घट्ट आलिंगन दिलें. नंतर अक्रूरानें बलरामाला नमस्कार करून आलिंगन दिलें; घरीं अक्रूरासारख्या पवित्र ब्राह्मणाचे पाय लागले, म्हणून नंदानें अक्रूराची पूजा करण्याचें योजिलें, यशोदा ऊष्णोदक आणून ते अक्रूराचे पायांवर ओतूं लागली व नंद अक्रूराचे पाय घासूं लागला. पादप्रक्षालन झाल्यावर नंदानें अक्रूराची षोडशोपचारें पूजा करून त्यास पंचपक्का- नांचें भोजन घातले व दक्षणा देऊन आज कां येणें झाले, असा प्रश्न केला. • तेव्हां अक्रूराने धनुर्यागाची सर्व हकीकत सांगून त्या यागासाठी कंसाने तुम्हां • सर्वांनां बोलाविलें आहे, व तें निमंत्रण करण्यासाठी त्यांनें मला मुद्दाम तुमच्याकड़े