पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ स्तबक जुलूम करीत असेल याचा विचार कर, व आतां आपल्या भक्तांचा अधिक अंत पाहूं नकोस. " नारदानें कृष्णाला याप्रमाणे सांगितल्यावर श्रीकृष्ण न समजल्यासारखे करून नारदाला ह्मणाले; नारदा ! तूं ह्मणतोस तें सर्व खरें, पण त्या दुष्टाचा नाश कसा करावा, तें मला तर कांही कळत नाही. " तेव्हां नारद ह्मणाला; हे श्रीकृष्णा ! त्या कंसानें आतां तुझ्या नाशाची निराळीच योजना केली आहे. त्यानें धनुर्यागाला आरंभ केला असून त्या यागासाठीं ठिकठिकाणचे धनुर्धारी, कुस्ती खेळणारे मल्ल, टकरी मारणारे हत्ती, वगैरे गोळा केले आहेत. चाणुर व मुष्टिक या नावाच्या प्रसिद्ध मल्लांनी तुझा वध करण्याचा विडा उचलला आहे. तुला त्या यागासाठी लवकरच कंसाकडून निमंत्रण येईल, त्या वेळीं तूं तेथें जा, व कंसाचा नाश करून सर्वानां सुखी कर. " नारदानें याप्रमाणें कृष्णाला सांगितल्यावर श्रीकृष्णानें नारदाचा अत्यंत गौरव करून त्याला निरोप दिला. १६८ कथाकल्पतरु. ४. कंस व अक्रूर यांचा संवाद. नारदानें कृष्णाला सांगितल्याप्रमाणे कंसानें मथुरेस धनुर्यागाची मोठी तयारी केली होती; त्या समारंभाला कृष्णानें नंदगोपाळांसह यावें ह्मणून कंसानें अक्रू- राला नंदाकडे पाठविण्याचे ठरविलें. अक्रूराला जवळ बोलावून त्याला कंस ह्मणाला; हे अक्रूरा ! तूं अत्यंत थोर अंतःकरणाचा उदार व बुद्धिवान् आहेस; सर्व यादवांमध्ये मला तूं विशेष दक्ष दिसतोस; शिवाय माझ्या हिताची तुला विशेष काळजीहि आहे; तर तूं गोकुळांत सह या धनुर्यागाच्या समारंभासाठी घेऊन ये. 66 जा व नंदाला त्याच्या परिवारा विशेषतः कृष्ण व बलराम है दोघे या समारंभासाठीं येतील अशी तूं अवश्य खटपट कर. कृष्णाने आजपर्यंत माझें किती नुकसान केलें आहे, त्यानें मला किती त्रास दिला आहे, माझे मोठे बलाढ्य वीर नाहींसें करून मला कसें भंडावून सोडिलें आहे, हें तुला माहित आहेच; त्या कृष्णाला युक्तीनें नाहींसा करण्याचा माझा विचार आहे.' ही गोष्ट तूं माझा सुहृद ह्मणून तुला मुद्दाम कळविली आहे. तूं माझा हा उद्देश कोणालाहि कळविणार नाहींस असा मला भरंवसा आहे. " कंसाचें भाषण ऐकून अक्रूर कंसाला ह्मणाला; महाराज ! आपले हित व्हावे अशी माझी खरोखर इच्छा आहे, आपल्या कल्याणाविषयीं माझा नेहमी प्रयत्न असतो; परंतु या सेवकाच्या प्रयत्नाकडे स्वामीचें लक्ष नाहीं. याबद्दल फार खेद वाटतो. महाराज ! आपण त्या कृष्णाला व बलरामाला येथे आणून त्यांचा नाश करण्याचे योजिले आहे, परंतु या कार्यात आपणाला यश येईल असे मला वाटत नाहीं. इतकेच नव्हे, तर कदाचित् आपला नाशहि होण्याची मला भीति वाटत आहे; ह्मणून त्या दोघांनां आपण येथे आणण्याचें न कराल तर बरें असें मला वाटतें. आह्नीं आपले दास आहोत, आपली आज्ञा मला शिरसा वंद्य आहे, आपण सांगतां त्याप्रमाणे मो