पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ कथाकल्पतरू, [[] [स्तक प्राप्त झाल्यावर तो आपल्या घरीं जाऊं लागला. तेव्हां मो त्यास आपणा बरोबर विवाह करण्या विषयीं विनंति केली, पण माझी विनंति अमान्य करून तो हाणाला, "देवयानीं, तुझें व माझे नातें बंधुभगि- नीचें आहे, आपण दोघेही एकाच शुक्राचार्याच्या पोटचे आहोत. तेव्हां मला तुजवरोबर विवाह करितां येत नाहीं." असें कचानें सांगितल्यावर मला त्याचा फार राग आला व मी त्याला, 'तुला संजीवनी विद्या फलद्रूप होणार नाही,' ह्मणून शाप दिला. तेव्हां त्यानेंहि मला असा शाप दिला की, 'तुझा विवाह ब्राह्मणाबरो- बर न होतां क्षत्रियाबरोबर होईल.' ४ देवयानीचा विवाह. याप्रमाणें आपलो हकोकत सांगून देवयानी ययाति राजाला ह्मणाली; “राजा, माझा पति आतां तूंच आहेस. तूं जर माझा अव्हेर करशील तर मी प्राणत्याग करीन." हे ऐकून ययाति राजा हाणाला; "देवयानी, तुझ्या पित्याला जर ही गोष्ट कबूल असेल तर मी तुजबरोबर विवाह करण्यास तयार आहे. " असें ययातीनें सांगितल्यावर देवयानी ययातीस आपल्या बापाकडे घेऊन आली, व तिनें आपल्या पित्याला सर्व हकीकत सांगितली. तेव्हां शुक्रा- चार्यास आपल्या मुलीचा विचार पसंत पडला. व त्यानें ययातीबरोबर देवयानीचा विवाह लावून दिला. नंतर देवयानीने शर्मिष्ठा आपणास काय काय बोलली; तिनें आपणास विहिरीत कसे ढकलून दिले वगैरे सर्व हकीकत शुक्रा- चार्यास कळविला. तें ऐकून शुक्राचार्यास फार राग आला, ते रागानें लाल होऊन वृषपर्व्याकडे गेले व त्यांनी शर्मिष्ठेनें केलेला अपराध त्याच्या कानावर • घातला. शुक्राचार्याचा तो राग पाहून वृषपर्वा थरथर कांपू लागला. तो ह्मणाला; "गुरुमहाराज, मला क्षमा करावी, आपण सांगाल तें शासन मी शर्मीष्ठेला करण्यास कबूल आहे." त्यावेळी देवयानी जवळच होती, ती ह्मणाली कीं, 'शर्मिष्ठेने माझी बटिक होऊन राहिले पाहिजे.' शुक्राच्या शापभयानें वृषपर्व्यानें ही गोष्ट कबूल केली, बापाच्या कल्याणासाठीं शर्मिष्ठेनेंहि त्या शोचनीय स्थितीत राहण्याचें कबूल केलें. मग ययाति राजानें देवयानीस व शर्मिष्ठेस बरोबर घेतलें व तो मोठ्या समारंभानें आपल्या नगरास आला. नगरांत आल्यावर ययाति राजानें देवया- नीचे सांगण्यावरून शर्मिष्ठेला नगराबाहेर मंदिर बांधून तेथे ठेविलें. ५ शुक्राचार्याचा शाप. असे एक संवत्सर गेल्यानंतर देवयानीस मुलगा झाला. त्याचें नांव यदु ठेविलें. हाच यदु कृष्णाचा पूर्वज होय. नंतर कांही दिवसांनीं दुसरा मुलगा झाला. त्याचें नांव तुर्वसू असें ठेविलें. इकडे शर्मिष्ठा ब्याचे दिवस कष्टानें काढित असतांना, एके दिवशीं आपल्या दुःकारक आयु- राजा ययाति, तिच्याकडे