पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ था. ] अध्याय ६ वा. १६७ तेव्हांच ओळखिलें, व त्याचे मागील पाय धरून गरगर फिरविलें व एका पाषाणा- वर आपटून त्याची जन्ममृत्यूच्या भवबंधनांतून सुटका केली. तेव्हां गोपाळांनां अत्यानंद झाला व ते त्या आनंदाच्या भरांत कृष्णाचा जयजयकार करून कृष्णावरून आपल्या घोंगड्या ओंवाळू लागले. केशी राक्षसाची झालेली दुर्दशा कंसाला कळल्यावर त्याला कृष्णाचा अधिक संताप आला व त्यानें कृष्णाच्या नाशासाठी व्योमासुर नांवाचा दुसरा राक्षस पाठविला. हा व्योमासुर राक्षस महा पराक्रमी असून कपटविद्येत निपुण होता. गोकुळांत आल्यावर त्यानें एके दिवशीं संधि साधून गोपाळ, गायी व वांसरें यानां एका विवरांत नेऊन ठेविलें; कृष्ण येऊन पाहतो तो तेथें गायी, गोपाळ कोणीही नाहीं. . मग विचार करतां असे होण्याचें कारण त्याच्या लक्षात आलें. मग कपटाशीं १ कपटच केले पाहिजे, असें योजून श्रीकृष्ण भगवान् झोपेचें मिप करून स्वस्थ निजले. श्रीकृष्ण स्वस्थ निजले आहेत असे पाहतांच तो कपटी व्योमासुर राक्षस तेथें आला व त्यानें कृष्णाला उचलून त्या विवरांत नेऊन ठेविलें व सर्वास कोंडून मारावें या उद्देशानें तो त्या विवराचा मार्ग बंद करूं लागला; इतक्यांत कृष्णानें त्याला पकडून आकाशांत गरगर फिरवून दगडावर आपटून ठार मारिलें व सर्व गाईगोपाळांची त्या विवरांतून सुटका केली. ३. श्रीकृष्ण नारद संवाद. ' एके दिवशीं श्रीकृष्ण भगवान् स्वस्थ बसले असतां तेथें नारद आला. तो कृष्णाला नमस्कार करून म्हणाला; " हे श्रीकृष्णा ! तूं केवळ दुष्टांच्या संहारा- साठी व साधूंच्या संरक्षणासाठी अवतार घेतला आहेस, आजपर्यंत अनेक राक्षस मारून तूं या सर्व लोकांवर व पृथ्वीवर अनंत उपकार केले आहेस, व या आपल्या कृतीनें सर्वानां पूजार्ह व वंद्य झाला आहेस. कृष्णा ! तूं सर्व कांहा जाणत आहेसच; तुला मी सांगावयाला पाहिजे असें नाहीं, परंतु तूं आपल्या अनेक भक्तांच्या संकटाचें निवारण करीत असून प्रत्यक्ष ज्यांनी तुला जन्म दिला, त्या आईबापांच्या सुटकेचा कांहींच प्रयत्न न करितां खुशाल गोकुळांत क्रीडा करीत आहेस याचें मला फार आश्चर्य वाटतें. कृष्ण आपले कष्ट दूर करील, असा त्या वमुदेवदेवकीला तुझा मोठा भरंवसा, परंतु तूं तर आपला स्वस्थ आहेस. कृष्णा ! त्या देवकीचे सुकुमार हातपाय शृंखलांनीं काचून गेले आहेत, वसुदेव त्या अत्यंत जड अशा शंखलाभारानें असह्य यातना भोगीत आहे. तो दुष्ट कंस त्या दोघांचे निर्दयपणे अमानुष हाल करीत आहे, त्या आपल्या आई- बापांसाठी कांही प्रयत्न करून त्या दुष्टाचा नाश कर. त्यानें सर्व लोकांनां अत्यंत दुःखी केलें आहे, असा क्रूर व मूर्ख राजा आह्नाला मिळाला म्हणून त्याची प्रजा सारखा टाहो फोडित आहे. हे देवाधिदेवा ! जो कंस प्रत्यक्ष • बापाला तुरुंगांत ठेवून त्याचे हाल करीत आहे, तो आपल्या प्रजेवर किती