पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ स्तबक ह्मणाला; "बा कंसा ! तुला हे चार लोक चार प्रकारची सल्ला देतात पण यावर तूं विश्वास ठेवू नकोस. जन्म, जरा व मृत्यु या तीन अवस्था सर्व प्राणिमात्रांनां आहेत; त्या अवस्था चुकविण्याचा प्रयत्न करणें हें मुळींच कोणा- च्याहि स्वाधीन नाहीं; जसें कर्म करावें तसें त्याचें फल मिळत असतें. मनुष्य हा आपल्या कृतीनेंच आपला शत्रु व मित्र होतो; तूं आपल्या निंद्य, नीच व निर्दय अशा आचरणांनी आपणा स्वतःचाच शत्रु झाला आहेस, मग तुला दुसरे अनेक शत्रु निर्माण होतील यांत मोठेर्से नवल तें काय ? बंध व मोक्ष ह्रीं दोन्हीं ज्याच्या त्याच्या आचरणाची फलें असून मनुष्य निष्कारण दुसऱ्याला दूषण देत असतो. तूं आपल्या हातानें अनेक पापकर्मै केलीं आहेस त्यामुळे तुला समाधान न वाटतां आपला कोणी येऊन नाश करील कीं काय, ही भीति तूं स्वतःच उत्पन्न करून घेऊन निष्कारण काळजीत पडला आहेस. अजूनही त्या निंद्य आचरणापासून दूर हो, घडलेल्या पापकृतीबद्दल पश्चात्ताप व्यक्त कर व ज्यांनां दुःख दिलें असशील त्यांची मोकळ्या अंतःकरणानें क्षमा माग, ह्मणजे या काळजींतून व भीतींतून मुक्त होऊन तुला समाधानानें राहतां येईल. " हा उग्रसेनाचा सल्ला अत्यंत फायद्याचा होता, पण तो त्या कंसाला पसंत पडला नाहीं; इतकेच नव्हे, तर असा उपदेश केल्याबद्दल त्याला आपल्या बापाचा फार राग आला व तो बापावर ऋद्ध होऊन म्हणाला; "मला मारून राज्यावर बसण्याची तुझांला आतां ह्यातारपणीं विशेष हांव सुटलो आहे, आणि तेवढ्याचसाठी तुमचा हा सारा प्रयत्न चालला आहे. मला उपदेशाच्या लांब लांब गोष्टी सांगून माझ्या शत्रूला जिवंत ठेवण्याचा तुमचा विचार आहे. जो बाप आपल्या मुलाचें इतकें अकल्याण चिंतून त्याला मारून त्याचें राज्य घेण्यास तयार होतो, तो खरोखर पिता नसून त्या मुलाचा काळच होय. प्रत्यक्ष घरांतल्या घरांत बाप जर मुलाशी इतकें वैर करितो, तर मग मला बाहेर जे इतके शत्रु निर्माण झाले आहेत, ते आपणच निर्माण केले आहेत असे ह्मणावयाला काय प्रत्यवाय आहे ?" २. केशी व व्योमासुरवध तो दुष्टबुद्धि कंस आपल्या बापाला याप्रमाणें मनास वाटेल तें बोलून स्वस्थ न बसतां त्यानें दूतांकडून त्याला लोहशृंखलांनीं बद्ध करविले व तुरुंगांत नेऊन ठेविलें; त्याप्रमाणें वसुदेव व देवकी या दोघांनांहि पकडून आणून बंदि- शाळेत नेऊन ठेविलें. याप्रमाणें व्यवस्था केल्यावर कंसानें केशी नांवाच्या एका प्रबल वीराला बोलावून त्याला कृष्णाच्या नाशासाठी गोकुळांत पाठविलें. तो केशी राक्षस गोकुळांत जेथें गोपाळांसह कृष्ण खेळत होता, तेथें घोड्याचें रूप धरून गेला व गोपाळांना टाफा मारण्याचा व चावण्याचा त्यानें प्रयत्न सुरू केला. तो प्रकार पाहून हा कोणीतरी कपटी राक्षस आहे असे कृष्णानें १६६ कथाकल्पतरु.