पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ था. ] अध्याय ६ वा. अध्याय ६ वा. - १६५ १. कंसनारदसंवाद. गोकुळांत श्रीकृष्ण ज्या कांहीं क्रीडा करीत असे त्याची हकीकत गुप्त दूतां- कडून कंसाला प्रत्यहीं कळत असे. त्या लीलालाघवानें कंसाच्या पायाची आग सांगित- मस्तकाला जात असे व त्याची स्थिति मोठी चमत्कारिक होत असे. श्रीकृ- ष्णाच्या पराक्रमाच्या अनेक गोष्टी ऐकून कंसाची अशी दृढ भावना झाली होती किं, हाच आपला शत्रु आहे व याच्याच हातानें आपला मृत्यु होणार. आकाश- वाणीनें सुचावलेला व आपल्या हातांतून निसटून गेलेल्या मुलीने लेला शत्रु तो हाच असावा अशी त्याची पक्की समजूत झाली होती. तो कृष्णाच्या नाशासाठीं जो जो प्रयत्न करीत असे तो तो समूळ फसून उलट त्याचीच फजिती व नुकसान होत असे. पूतनेपासून तो अरिष्ट राक्षसापर्यंत जेवढे चांगले चांगले पराक्रमी व हुषार दैत्य त्यानें पाठविले होते त्या सर्वांनां कृष्णानें यम- लोकी पाठविल्यामुळे कंसाला पुढे काय करावें तें अगदी सुचेनासें झालें होतें; इतक्यांत तेथें नारदमुनि फिरत फिरत आले. कंसानें नारदाचें सत्कारपूर्वक स्वागत केलें, व त्यांनां सांप्रत आपण कोणत्या विवंचनेंत आहों तें विदित केलें. ते ऐकून नारद म्हणाले; " कंसा ! ज्या वेळी आकाशवाणीनें तुला तुझ्या मृत्युबद्दलचें भविष्य सांगितलें त्याच वेळीं जर तूं आपली बहीण देवको, हिचा नाश केला असतास तर तुला इतकी काळजी करण्याचें कांहींच कारण पडलें नसतें; परंतु त्या वेळीं वसुदेवाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तूं सर्वतो- परी फसलास. त्या वसुदेवाला तुरुंगांत असतांनां बलराम व कृष्ण अशीं दोन मुले झालीं तीं त्यानें तुला कळू न देतां मोठ्या युक्तीनें गोकुळांत नंदाचे घरीं नेऊन ठेविलीं, त्याचा हा सर्व परिणाम आहे. कंसा ! ती देवकी तुझी बहीण नसून तुझी वैरीण आहे. " नारदाचें तें भाषण ऐकून कंसाला देवकीचा व वसुदेवाचा अत्यंत राग आला व तो तरवार घेऊन त्यानां मारण्याकरितां त्यांच्या अंगावर धावून गेला. तेव्हां नारद कंसाचा हात धरून म्हणाला;

  • “ कंसा ! आतां या देवकीला व वसुदेवाला मारून काय फायदा आहे ? जे

व्हावयाचें तें तर होऊन गेले. तेव्हां यांना मारून आतां निष्कारण अपकीर्ति तरी कां करून घेतोस ? सर्प विवरांतून निघून गेल्यावर विवर उकरण्यांत जसा कांहीं फायदा नाहीं त्याप्रमाणेंच श्रीकृष्ण गोकुळांत निघून गेल्यावर या वसुदेव- देवकीला मारण्यांत कांहीं फायदा नाहीं. तुझा जो खरा शत्रु आहे त्याचा नाश कर, म्हणजे या काळजींतून तूं मुक्त होशील." कंसाचा बाप उग्रसेन हा त्या वेळी तेथें जवळच होता. तो वृद्ध असून अत्यंत सत्वशील होता; त्याला तो नारदाचा सल्ला पंसत पडला नाही. तो कंसाला A