पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६४ . [[ स्तबक आपले सन्निध असून आपण निष्कारण देवांनां शोधित फिरतों अर्से त्यांन वाटू लागलें. cole कथाकल्पतरु. . ५. शंखचूडवध व अरिष्टासुरवध. एके दिवशीं श्रीकृष्ण भगवान् आपल्या खेळगड्यांसह यमुनेच्या कांठी खेळत असतां, तेथें शंखचूड नांवाचा एक राक्षस आला. तो शंखचूड कुबेराचा सेवक असून नाचतांना ताल चुकला होता, म्हणून कुबेरानें त्याला राक्षस होशील असा शाप दिला होता; त्याप्रमाणें तो राक्षस होऊन पृथ्वीवर संचार करीत होता. तो कंसाचा मोठा स्नेही असून सहज एके दिवशीं कृष्णाची लीला पहावयास आला होता; पाहतो तो श्रीकृष्ण भगवान् स्वर्गांगना व अनेक सुंदर अप्सरा यांच्याबरोबर खेळत आहे. तो प्रकार पाहून त्या शंखचूड राक्षसाला कृष्णाचा व त्या देवांगनांचा फार राग आला. ह्या स्वर्गोगना असून या मनुष्याबरोबर खेळत आहेत, ह्याबद्दल तो त्या सर्वोवर क्रुद्ध झाला व त्या सर्वांना मृत्युपुरीला पाठविण्याच्या तयारीनें त्यांच्या अंगावर धावून गेला. त्यानें सर्व अप्सरांनां व देवांगनांनां एके ठिकाणी बांधले व नंतर तो कृष्णाच्या अंगावर चालून गेला, तेव्हां कृष्णानें सहज लीलेनें त्या शंखचूडाला धरले व गरगर फिरवून जमिनीवर आप- टून मारिलें. त्या राक्षसाजवळ एक दिव्यमणी होता, तो मणी कृष्णानें घेऊन त्याचें भूषण केले. नंतर त्या स्वर्गोगना स्वर्गलोकी गेल्या व श्रीकृष्ण गोपाळांसह गोकुळांत परत आला. पुढें कंसानें श्रीकृष्णाच्या नाशासाठी अरिष्ट या नांवाचा एक महापराक्रमी राक्षस पाठविला होता. हा राक्षस अत्यंत पराक्रमी असून शरिरानें फारच विक्राळ होता. तो गोकुळांत आला व त्यानें आपला जबडा पसरून सर्व गोकुळ गिळून टाकण्याचा विचार केला. तो भयंकर प्रकार पाहून गोकुळांतील सर्व लोक अत्यंत भयभीत झाले व आज सर्व एकदम मरण पावणार या चिंतेनें ग्रस्त होऊन त्यांनीं कृष्णाचा धांवा केला. तेव्हां श्रीकृष्ण भगवान् हळूच त्या राक्षसाच्या मागे गेले, व त्याचे पाय धरून गरगर फिरवून पृथ्वीवर आपटलें तरी तो राक्षस मरण पावला नाहीं. म्हणून कृष्णानें त्याला पुन्हां गरगर फिरविलें व जमिनीवर आपटलें; याप्रमाणें सात वेळां त्या अरिष्ट राक्षसाला आपटलें; तेव्हां तो दुष्ट राक्षस मरण पावला. अशा रीतीनें त्या भयंकर अरिष्टाचें निवारण झाल्यावर सर्व गवळी शांत झाले, व त्यांची श्रीकृष्णाच्या सामर्थ्याविषयी दिवसेंदिवस अधिकाधिक खात्री होऊन श्रीकृष्ण हा प्रत्यक्ष भगवान् आहे अशी त्यांची दृढ समजूत झाली.